घरमुंबईतुम्ही तर 'वाचाळवीर'; शिवतारेंच्या नोटिशीबाबत किशोरी पेडणेकरांची तिखट प्रतिक्रिया

तुम्ही तर ‘वाचाळवीर’; शिवतारेंच्या नोटिशीबाबत किशोरी पेडणेकरांची तिखट प्रतिक्रिया

Subscribe

शिंदे गटात आमदार कसे घेतले जातात हे सर्वाना माहित आहे.

खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा शिंदे गटानं दिलाय. सुप्रिया सुळे, अजित पवार आणि आदित्य ठाकरेंवर मानहानीचा दावा ठोकू असं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी सांगितले आहे. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (vijay shivtare) यांनी नोटीस देण्याचा इशारा दिल्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी माध्यमांना प्रतिक्रया देताना चांगलेच प्रत्त्युत्तर दिले.

शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर शिवतारे यांना उद्देशून म्हणाल्या, ‘लोकशाहीने तुम्हाला सर्व अधिकार दिले आहेत. आणि लोकशाहीचा स्तंभ म्हणून जर तुम्ही कोर्टात गेलात आणि प्रत्येकावर केस करायला लागलात तर पुरावे सुद्धा आहेत हे विसरू नये’ असं ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

- Advertisement -

‘उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी कोणाला अडवलं नाही. कोणाला जायचं असेल त्यांनी जा असं उद्धव ठाकरे यांनी आधीच सांगितले आहे. त्यामुळे आताही कोण शिंदे गटात जाणार असेल तर त्यांना थांबणार नाही. मग येणार येणार असं म्हणून हवा प्रदूषण करू नका असा खोचक टोला सुद्धा किशोरी पेडणेकर यांनी लगावला. त्याचबरोबर शिंदे गटात आमदार कसे घेतले जातात हे सर्वाना माहित आहे’.

त्याचसोबत ‘मुख्यमंत्री शिंदे (cm eknath shidne) यांना इतर कुणी नाही तर तुम्ही सगळे वाचाळवीर होऊन त्रास देत अहात’ असा टोला सुद्धा पेडणेकर यांनी शिवतारे यांना लगावला. याचबरोबर मंत्री अब्दुल सत्त्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात केलेल्या विधानावर पेडणेकर म्हणाल्या ‘मंत्री असताना एखाद्या पुरुषाने एका महिलेला असं बोलणं चुकीचं आहे आणि सत्तार हे वाचाळवीर म्हणून प्रसिद्धच आहेत’ असं त्या म्हणाल्या.

- Advertisement -

‘अश्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राचा स्तर बिघडत चालला आहे. या संदर्भात सामना मधून फडणवीसांना (dcm devendra fadnavis) आवाहन करण्यात आले होते त्याला फडणवीसांनी चांगला प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सर्वाना भाषा जपून वापरा असं सांगितलं आहे. सर्वानाच ही तंबी आहे’. असंही पेडणेकर म्हणाल्या.


हे ही वाचा – खोके म्हटल्यावर झोंबतं का? ते पहिल्यांदा सांगा मग नोटीस; आदित्य ठाकरेंचे शिंदे गटाला प्रत्युत्तर

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -