Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई kitchen Hacks-कुकरमधून डाळ बाहेर आलीये, टाईल्सवर मसाल्याचे डाग पडलेत, झटपट लसून सोलायचाय..

kitchen Hacks-कुकरमधून डाळ बाहेर आलीये, टाईल्सवर मसाल्याचे डाग पडलेत, झटपट लसून सोलायचाय..

Subscribe

किचनमध्ये काम करणे हे प्रत्येक महिलेसाठी आव्हानात्मक आहे. रोज अनेक पदार्थ आपण किचनमध्ये बनवत असतो. यामुळे किचन आणि रोजच्या वापरातील भांडी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. कधी कधी कूकरच्या शिट्टीतून डाळ बाहेर येते. तर कधी कधी उकळलेलं दूध ओट्यावर सांडून डाग पडतात. अशी एक ना अनेक काम किचनमध्ये महिलांना एकाचवेळी हाताळावी लागतात. त्यासाठी आम्ही काही टिप्स देत आहोत. ज्यामुळे तुमची काम झट की पट होतील.

- Advertisement -

जेवण बनवताना अनेकवेळा किचन टाईल्सवर मसाल्याचे, तेलाचे डाग पडतात. साबणाने हे डाग वरचेवर निघतात. पण पूर्णपणे ते निघत नाहीत अशावेळी व्हिनेगर आणि बेकींग सोडा यांची पेस्ट बनवावी. ती टाईल्सवर लावावी. नंतर टाईल्स स्वच्छ करावी.

- Advertisement -

मिक्सरमध्ये सतत मसाला, चटणी ग्राईंड केल्याने ब्लेंडरमधील ब्लेडची धार कमी होते. अशावेळी ब्लेडची धार कायम ठेवण्यासाठी ब्लेंडरमध्ये थोडे सैंधव मीठ टाकावे.

लसूण सोलणे हे तसे वेळखाऊ काम आहे. म्हणून हा वेळ वाचवायचा असेल तर ३० सेकंदासाठी लसूण मायक्रोव्हेवमध्ये ठेवा. नंतर लसणाची साल आरामात निघेल.

साखरेच्या डब्याला मुंग्या लागत असतील तर त्यात २-३ लवंग ठेवा. मुंग्या डब्याच्या आसपासही फिरकणार नाहीत.

कोथिंबीर किंवा पुदीनाचा वापर जवळजवळ सगळ्याच भाज्यांमध्ये आपण करतो. पण फ्रिजमध्ये कोथिंबीर फार काळ फ्रेश राहत नाही. ती सुकते. यासाठी काचेच्या बाटलीत किंवा कंटेनरमध्ये कोथिंबीर किंवा पुदीना ठेवावा. बरेच दिवस फ्रेश राहतो.

तळलेला बटाटा जर तुम्हांला आवडतो पण तेलकट खाणे आरोग्यास अपायकारक आहे. त्यामुळे तुम्ही बटाटा खाण्यास मागेपुढे बघत असाल तर तळण्याआधी बटाटा उकडून घ्या. त्यामुळे बटाटा तेलकट होणार नाही.

 

 

 

- Advertisment -