केएल राहुल- आथिया शेट्टी यावेळी घेणार साथ फेरे

टीम इंडियाचा क्लास बॅटर केएल राहुल आणि त्याच्या कुटुंबियांसाठी तसेच क्रिकेट फॅन्ससाठी आजचा दिवस खास आहे. केएल राहुल आणि अभिनेता सुनिल शेट्टी याची कन्या आथिया यांचा आज विवाह होणार आहे.

टीम इंडियाचा क्लास बॅटर केएल राहुल आणि त्याच्या कुटुंबियांसाठी तसेच क्रिकेट फॅन्ससाठी आजचा दिवस खास आहे. केएल राहुल आणि अभिनेता सुनिल शेट्टी याची कन्या आथिया यांचा आज विवाह होणार आहे. यामुळे त्यांच्या या लग्नसोहळ्याबदद्ल जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ठरलेल्या मुहूर्ताप्रमाणे दुपारी चार वाजता दोघांचे सात फेरे होतील. (KL Rahul Athiya Shetty Wedding on 4 pm) त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता केएल राहुल आणि आथिया मीडिया समोर येणार आहेत . सुनील शेट्टी यांनी लग्नानंतर मुलांसह मीडियाशी संवाद साधणार असल्याचे  सांगितले होते. तसेच इतके प्रेम दिल्याबद्दल सुनिल शेट्टी यांनी चाहत्यांचेही आभार मानले आहेत.

सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील बंगल्यात हा लग्न सोहळा होणार आहे. (sunil shetty khandala bungalow) लग्नातील मेन्यू साऊथ पध्दतीचा असणार आहे. म्हणजेच या लग्नात पाहुण्यांना ताटात नव्हे तर पारंपारिक दक्षिण भारतीय पद्धतीनुसार केळीच्या पानांवर जेवण दिले जाईल.

3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे.
राहुल आणि आथिया शेट्टी गेल्या ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. (KL Rahul Athiya Shetty date) कोरोनाकाळात फक्त कुटुंबातील सदस्यांना खेळाडूंसोबत भेटण्याची परवानगी होती तेव्हा अथिया आणि राहुल इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाच्या कॅम्प सोबत दिसले होते.