Tuesday, May 30, 2023
घर मानिनी Health Hypertension : 'या' फळाचे सेवन केल्याने होतील समस्या दूर

Hypertension : ‘या’ फळाचे सेवन केल्याने होतील समस्या दूर

Subscribe

रक्तदाब वेगाने वाढल्यामुळे लोकांना उच्च रक्तदाबाच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि यामध्ये तुमचा आहार महत्त्वाची भूमिका बजावतो.

तुमचा आहार चांगला असेल तर तुम्ही अनेक आजार (illness) आणि आरोग्यांच्या समस्यांतून मुक्त होऊ शकता. उच्च रक्तदाब (Hypertension) हा देखील अशाच समस्यांपैकी एक आहे. रक्तदाब वेगाने वाढल्यामुळे लोकांना उच्च रक्तदाबाच्या (Hypertension) समस्येचा सामना करावा लागतो आणि यामध्ये तुमचा आहार (proper diet) महत्त्वाची भूमिका बजावतो. सामान्य रक्तदाब पातळी 120/80 mmHg किंवा त्यापेक्षा किंचित कमी आहे. पण, जर तुमचा रक्तदाब खूप जास्त असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत आणि आहारात बदल करणे गरजेचे आहे.

आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की, उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी, कमी चरबीयुक्त, कमी कोलेस्ट्रॉलयुक्त (cholesterol) आहार घेणे आवश्यक आहे. याशिवाय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी फायबर आणि पोटॅशियम जास्त असलेली फळे आणि भाज्या खा. हायपरटेन्शनच्या आहारासाठी केळी (Banana) सर्वात फायदेशीर मानली जाते.

- Advertisement -

जाणून घ्या उच्च रक्तदाबासाठी केळी किती फायदेशीर?

- Advertisement -

फायबर आणि जीवनसत्त्वे खावी

केळीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आढळते. यासोबतच यामध्ये विरघळणारे फायबर देखील असते. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते आणि हृदयरोगाचा धोका कमी करते.

अँटिऑक्सिडंट्स भरपूर

केळ्यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आढळतात जे आपल्याला अनेक रोग आणि संक्रमणांपासून वाचवण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडंट्स नैसर्गिकरित्या आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

पोटॅशियमचा उत्तम स्रोत

केळीमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते, त्यामुळे ते उच्च रक्तदाबासाठी योग्य मानले जाते. हे खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. रक्तदाब सामान्य ठेवण्यासाठी पोटॅशियम महत्त्वाची भूमिका बजावते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एका मध्यम आकाराच्या केळीमध्ये 450 ग्रॅम पोटॅशियम असते.

सोडियम कमी

केळ्यामध्ये सोडियमचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे ते रक्तदाब नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही पोटॅशियम युक्त गोष्टी जितक्या जास्त खातात तितके सोडियम तुमच्या शरीरातून बाहेर पडते.


हेही वाचा – ‘या’ 5 कारणांमुळे सतत दुखते कंबर, महिलांनो वेळीच लक्ष द्या

 

- Advertisment -

Manini