घर मुंबई मुंबई विमानतळावर २८ कोटींचे कोकेन जप्त; आरोपी अटकेत

मुंबई विमानतळावर २८ कोटींचे कोकेन जप्त; आरोपी अटकेत

Subscribe

मुंबईः मुंबई विमान तळावर कस्टम विभागाने सोमवारी २८ कोटींचे कोकेन जप्त केले. प्रवाशाने बॅगेत हे कोकेन लपवले होते. त्याच्या सामानाची तपासणी केली तेव्हा कस्टम विभागाला हे कोकेन सापडले. आरोपी प्रवाशाला कस्टम विभागाने अटक केली आहे.

आरोपीने आफ्रिकेतील अदीस अबाबा येथून हे २८ किलो कोकेन मुंबईत आणले होते. मुंबईतून हे कोकेन तो दिल्लीला नेणार होता. मात्र मुंबई विमानतळावर त्याच्या हालचाली कस्टम अधिकाऱ्यांना संशयित वाटल्या. कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या सामानाची तपासणी केली. बॅगेतील एका कप्यात अधिकाऱ्यांना कोकेन सापडले. कोकेन लपवण्यासाठी आरोपीने बॅगेत खास कप्पा तयार केला होता. कोकेन जप्त केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

- Advertisement -

अटक केल्यानंतर आरोपी प्रवाशाला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. कोकेनची तस्करी करणारी टोळी सक्रिय आहे का, याचा शोघ पोलीस घेत आहेत.

हनी ट्रपद्रारे कोकेनची तस्करी केल्याचे आरोपीच्या चौकशीतून समोर आले आहे. त्याच्याशी एका महिलेने सोशल मिडियावर मैत्री केली. त्याला नोकरी देण्याचे अमिष दाखवले. शारीरिक संबंध ठेवण्याचेही त्याला अमिष दाखवण्यात आले. याला भुलून आरोपीने हे कृत्य केल्याचे चौकशीत समोर आले आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून कस्टम विभागाकडून विमान तळावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. गेल्या शनिवारी विमान तळावर ४ किलो हिरोईन जप्त करण्यात आले. याची किमत सुमारे ३१ कोटी रुपये आहे. त्याचवेळी १६ किलो कोकेनही जप्त करण्यात आले. त्याची किमत १६ कोटी रुपये आहे. कोकेन सापडलेला प्रवासी २३ वर्षांचा आहे. मुलींच्या कुर्त्याच्या बटणांमध्ये त्याने कोकेन ठेवले होते. अंकीत सिंग असे आरोपीचे नाव आहे. तो कोकेनची तस्करी करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. तो ही अफ्रिकेतील अदीस अबाब येथून आला होता. हिरोईन सापडलेला प्रवासी केनिया येथून आला होता. फैजल साबीर असे आरोपीचे नाव आहे. त्याने १२ कागदपत्रांचे एक फोल्डर तयार केले होते. त्यामध्ये हिरोईन लपवले होते. त्याला कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावर अटक केली.

 

 

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -