घरमुंबईकोश्यारींनी महापुरुषांबद्दल केलेले वक्तव्य काल्पनिक नव्हते; हायकोर्टाचा दिलासा

कोश्यारींनी महापुरुषांबद्दल केलेले वक्तव्य काल्पनिक नव्हते; हायकोर्टाचा दिलासा

Subscribe

 

मुंबईः माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य हे महापुरुषांचा अपमान करणारे नव्हते. त्यांचे वक्तव्य कल्पना नव्हती, असा निर्वाळ उच्च न्यायालयाने दिला आहे.

- Advertisement -

न्या. सुनील शुक्रे व न्या. अभय वाघवासे यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिला आहे. न्यायालयाने कोश्यारी यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणीही फेटाळून लावली. मागसवर्गीयांचा अपमान करणारे त्यांचे वक्तव्य नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

याप्रकरणी राम खटानावरे यांनी फौजदारी याचिका केली होती. कोश्यारी आणि भाजपचे खासदार सिधांशु त्रिवेदी यांनी जाहिर भाषणात  महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्य केली आहेत. मागासवर्गींचा अवमान करणारी त्यांची वक्तव्य आहेत. त्यांच्या वक्तव्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे व त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. न्यायालयाने राम यांची मागणी अमान्य करत याचिका फेटाळून लावली.

- Advertisement -

 

या वक्तव्यावर होता आक्षेप

छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबला पत्र लिहिले होते. ते पत्र म्हणजे माफीनामा नव्हता. शिवाजी महाराजांनी सुटकेसाठीच प्रयत्न केले होते. शिवाजी महाराज त्या काळचे नेते होते. आता नेते बदले आहेत. तसेच सावित्रीबाई फुलेंचा १२ व्या वर्षी विवाह झाला. त्यावेळी त्यांचे पती महात्मा फुले हे १० वर्षांचे होते. त्या काळात हे दोघे जण काय बोलत असतील. तेव्हा आपण मुर्तीला नमस्कार करायचो. महाराष्ट्रातून जर गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, या माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यांवर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला होता.

कोश्यारींचा माफीनामा

आपल्या वादग्रस्त विधानांवर कोश्यारी यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाचं योगदान सर्वाधिक आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतूकपणे काही चूक झाली असेल, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -