मलिकांना कायदेशीर उत्तर बहिणच देणार, प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे क्रांती रेडकरचे स्पष्टीकरण

या प्रकरणाशी समीर वानखेंडेंचा काहीही संबंध नाही

Kranti redkar reaction on harshada redkar allegation by nawab malik
मलिकांना कायदेशीर उत्तर बहिणच देणार, प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे क्रांती रेडकरचे स्पष्टीकरण

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी समीर वानखेडेंची मेहूणी हर्षदा रेडकरवर उपस्थित केलेल्या आरोपांवर क्रांती रेडकरने प्रत्युत्तर दिले आहे.  ‘माझी बहिणच मलिकांना उत्तर देईल’, असे  क्रांती रेडकर हिने म्हटले आहे.  क्रांती रेडकरने एक पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. ज्यात क्रांतीने माझी बहिण नवाब मलिकांना कायदेशीर उत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात माझी बहीण पीडित असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे या प्रकरणावर बोलणे योग्य ठरणार नाही असे  स्पष्टीकरण क्रांतीने दिले आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणाशी समीर वानखेंडेंचा काहीही संबंध नसल्याचे देखील क्रांतीने नमूद केले आहे.

क्रांतीने ट्विट केलेल्या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे, मला माहिती आहे नवाब मलिकांनी ट्विट केलेल्या ट्विटबद्दल तुम्हाला बरेच प्रश्न पडले असतील. मला या माध्यामातून हेच सांगायचे आहे की, या प्रकरणात माझी बहिण पिडित आहे. आमच्या कायदेशीर टीमच्या मते, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे यावर कोणतीही टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही. माझी बहिण यासंदर्भात नवाब मलिकांना कायदेशीर उत्तर देणार आहे. त्याचप्रमाणे समीर वानखेडे यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, असे क्रांती रेडकरने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


समीर वानखेडे काय म्हणाले?

नवाब मलिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर समीर वानखेडे यांनी देखील प्रत्युत्तर दिले, हर्षदा रेडकरवर २००८मध्ये कारवाई करण्यात आली होती.त्यावेळी मी सर्व्हिसमध्ये देखील नव्हतो. २०१७मध्ये माझा क्रांती रेडकरसोबत विवाह झाला. त्यामुळे माझा या घटनेशी संबंध कसा काय? असा उलट प्रश्न  समीर वानखेडे यांनी मलिकांनी केला आहे.

नवाब मलिकांनी सोमवारी ट्विटवर काही पुरावे ट्विट करत समीर वानखेडेंसमोर काही प्रश्न उपस्थित केले. समीर वानखेडेंची मेहूणी हर्षदा रेडकरविरोधात एक केस पुण्यातील कोर्टात पेंडींग असून या प्रकरणाची पुढील सुनावणी मार्च २०२०मध्ये आहे का? हे प्रकरण खरे आहे का? समीर दाऊद वानखेडे तुमची मेहूणी हर्षदा दिनानाथ रेडकर हि ड्रग्ज व्यवसायात होती का? आणि समीर वानखेडेंशी याचा काही संबंध आहे का? असा सवाल नवाब मलिकांनी केला.


हेही वाचा – क्रांती रेडकरशी विवाह २०१७ मध्ये’ त्या प्रकरणाशी संबंध कसा? वानखेडेंचा मलिकांच्या आरोपांवर सवाल