घरमुंबईकुर्दिस्तानच्या मुलीवर मुंबईत उपचार; स्प्लिट कॉर्ड मालफंक्शन आजारावर उपचार

कुर्दिस्तानच्या मुलीवर मुंबईत उपचार; स्प्लिट कॉर्ड मालफंक्शन आजारावर उपचार

Subscribe

कुर्दिस्तानच्या एका अकरा वर्षीय मुलीवर मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहे. तिला स्प्लिट कॉर्ड मालफंक्शन हा दुर्मिळ आजार झाला होता.

कुर्दिस्तानच्या ११ वर्षीय मुलीच्या दुर्मिळ आजारावर मुंबईत यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. या मुलीला जन्मजात असलेल्या मज्जारज्जूच्या आजारावर ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. स्प्लिट कॉर्ड मालफंक्शन या दुर्मिळ आजाराने ही मुलगी जन्मापासूनच त्रस्त होती. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते हा अत्यंत दुर्मिळ आजार असून १ टक्क्यांहून कमी व्यक्तींना होतो.

स्प्लिट कॉर्ड मालफंक्शन आजार आहे तरी काय?

स्प्लिट कॉर्ड मालफॉर्मेशन हे असाधारण प्रकारचे स्पायनल डिस्रॅफिझम असून यात बाक तयार होऊन आणि मज्जा रज्जूचा दोरा तयार होऊन अनेक प्रकारची व्यंगे निर्माण होतात. ११ वर्षीय साव्या समन अली या मुलीला हा दुर्मिळ आजार झाला होता. साव्याला लहानपणापासूनच पाठीला असाधारण बाक आला होता. तिला चालण्यासही कठीण जात होते. यासाठी तिला मुंबईतील परळच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. साव्यावरील ही गुंतागुंतीची १० जुलैला झाली. ही शस्त्रक्रिया ६ तास सुरू होती. शस्त्रक्रियेनंतर साव्याने उपचारांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. तिला शस्त्रक्रियेच्या तीन दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला.

- Advertisement -

असे झाले आजाराचे निदान

या मुलीच्या आईला तिच्या चालण्यातला बदल जाणवला. हळुहळू तिच्या पाठीला आतल्या बाजूने बाक आला. तिचा उजवा पाय डाव्या पायापेक्षा लहान दिसू लागला. त्यानंतर, स्थानिक मेंदूविकारतज्ज्ञाने एक्स-रे आणि एमआरआयच्या माध्यमातून पाठीच्या कण्यातील आजाराचं निदान केलं. पाठीच्या कण्याच्या मध्यभागी हाडाचा एक असाधारण अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे, मज्जारज्जू दुभंगला होता आणि त्याची वाढ खुंटली होती.

या मुलीला पाठीच्या कण्याचा दुर्मीळ आजार झाला होता. त्यामुळे हाडाच्या अडथळ्यांमुळे तिचा मज्जारज्जू दुभंगला होता. याला स्प्लिट कॉर्ड मालफॉर्मेशन असं म्हणतात. स्पायनल डिस्रॅफिझम हे जन्मजात व्यंग आहे. स्पायनल कॉर्ड मालफॉर्मेशन हे १% हून कमी मुलांमध्ये आढळते. साव्याला नेमके याच आजाराने ग्रासले होते. सुरुवातीच्या काळात मुलामध्ये काहीही लक्षणे दिसून येत नाहीत, पण जसजशी मुलाची वाढ होत जाते स्पायनल टिथरिंगमुळे वेदना होतात, पाठीच्या कण्यात व्यंग निर्माण होते, चालताना समस्या उद्भवतात, अर्धांगवायू होतो आणि मूत्रविसर्जनावर नियंत्रण राहत नाही.”
– डॉ. सुरेश सांखला, ग्लोबल हॉस्पिटलमधील मेंदू शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख 

या कारणांमुळे होऊ शकतो आजार

गरोदरपणात झालेल्या कुपोषणामुळे हा आजार होऊ शकतो. त्यासाठी मायक्रोसर्जरी करून, अडथळा निर्माण करणारे हाड किंवा फायब्रस टिश्यु काढावा लागतो आणि मज्जारज्जूभोवतीच्या कवचाची पुनर्रचना करावी लागते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -