Kurla Fire: कुर्ला येथे इमारतीच्या पार्किंगमध्ये आग, २० दुचाकी जळून खाक

सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही

Kurla Fire: 30-35 bikes burnt Fire breaks in building parking lot at Kurla
Kurla Fire: कुर्ला येथे इमारतीच्या पार्किंगमध्ये आग, ३०-३५ दुचाकी जळून खाक

मुंबईत कुर्ला परिसरात भीषण आग लागली आहे. कुर्ला नेहरु नगर येथील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये बुधवारी ३:३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या जवळपास २० दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. आग इतकी भयंकर होती की आगीच्या ज्वाळा इमारातीच्या आठव्या मजल्यापर्यंत पोहचल्या होत्या.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तब्बल ८-९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमनदलाच्या जवानांना यश आले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. जळत्या सिगारेटचे थोटुक फेकल्यामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर इमारतीतील काही रहिवाश्यांनी इमारतीखाली बांधण्यात आलेल्या मंडपामुळे आगीचा भडका उडाल्याचे म्हटले आहे.

आगीचे लोट इमारतीच्या आठव्या मजल्यावर पोहचल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्नीशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आले असून आगीत कोणतीही जिवीत होनी झालेली नाही मात्र मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाल्याचे समोर येत आहे. कुर्ला परिसरातील या इमारतीत लागलेल्या आगीचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून या आगीची भीषणता किती होती हे पहायला मिळत आहे. ही भीषण आग का लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नसून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.


हेही वाचा – कोरोनापाठोपाठ साथीचे आजारही आटोक्यात; रुग्णांचे मृत्यू रोखण्यात यश