घरमुंबईकुर्ल्यात महापालिकेच्या कंत्राटदारावर गोळीबार

कुर्ल्यात महापालिकेच्या कंत्राटदारावर गोळीबार

Subscribe

मुंबईः कुर्ला येथे महापालिकेच्या कंत्राटदारावर गोळीबार झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेत कंत्राटदार व त्याचा चालक दोघेही बचावले आहेत. हल्लेखोर फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सूरज प्रतापसिंह असे हल्ला झालेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. कुर्ल्यातील कापाडिया नगर येथे ते पालिकेचे कंत्राटदार म्हणून काम करतात. ते बोरीवलीत राहतात. ही घटना सोमवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. काम संपवून ते घरी निघाले होते. कापडिया जंक्शनजवळ त्यांची गाडी आली तेव्हा दोघेजण तेथे आले. त्या दोघांनी सुरज प्रतापसिंह यांच्या गाडीवर हल्ला केला. हल्लेखोरांची गोळी सुरज यांना लागली नाही. सुरज यांच्या दिशेने झाडलेली गोळी त्यांच्या गाडीला लागली. त्यानंतर सुरज तेथून निघून गेले. गाडीवर गोळीबार करुन हल्लेखोर तेथून पळून गेले. कंत्राटदार सुरज प्रतापसिंग व त्यांचा चालक दोघेही बचावले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

सुरज प्रतापसिंह यांनी वाकोला पोलिसांत याची तक्रार दिली आहे. पोलीस याचा तपास करत आहेत. गोळीबार झाला तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याआधारावर चौकशी सुरु आहे. सुरज प्रतापसिंह यांचे कोणाशी वैर होते का? किंवा त्यांना कोणी धमकी दिली होती का? याचाही पोलीस तपास करत आहेत.

हा हल्ला निविदा मिळविण्यासाठी किंवा इतर काही कारणाने झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०७, ३४, हत्यार बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पकडण्यासाठी कक्ष ५ मधील विशेष अधिकाऱ्यांची काही पथके तयार करण्यात आली आहेत. गुन्हे शाखाही याचा स्वतंत्र तपास करत आहे.

- Advertisement -

रात्री ८ च्या सुमारास झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कंत्राटदारांवर अशाप्रकारे गोळीबार होत असेल तर पालिकेतील कामे कशी होणार, असा सवाल केला जात आहे. मुंबईतील कायदा व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -