घरमुंबईकुर्ल्यात बोगस कॉल सेंटरवर छापा; ८ जणांना अटक

कुर्ल्यात बोगस कॉल सेंटरवर छापा; ८ जणांना अटक

Subscribe

कुर्ला पश्चिम या ठिकाणी चालवण्यात येणाऱ्या एका बोगस कॉल सेंटरवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून व्यवस्थापकासह ८ जणांना अटक केली आहे.

कुर्ला पश्चिम या ठिकाणी चालवण्यात येणाऱ्या एका बोगस कॉल सेंटरवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून व्यवस्थापकासह ८ जणांना अटक केली आहे. या कॉल सेंटरमधून परदेशात कॉल करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत होती. ही कारवाई शुक्रवार, २ नोव्हेंबरला सकाळी गुन्हे शाखा ५ ने केली असून कॉल सेंटर चालवणारा मुख्य आरोपी फरार आहे. इकरामा नासीर मुकादम (२६), अरबाज उर्फ अयान गफार शेख (२०), शाहरुख युनूस अन्सारी (२०), जुनेद सलीम शेख (२२), कादिर अब्दुल्ला सय्यद (२०), आतिफ अस्लम शेख (२०), आहाद अब्दुल शेख (२१), सलमान अब्दुल मोगनी (२३) असे अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.

पोलिसांना बोगस कॉल सेंटरची माहिती

कुर्ला पश्चिम लाल बहादूर शास्त्री मार्ग या ठिकाणी असलेल्या सारा बिझनेस सेंटरच्या पहिल्या मजल्यावर बोगस कॉल सेंटर चालवण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ५ चे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, विश्वनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील आणि पथक यांनी सारा बिझनेस सेंटरच्या पहिल्या मजल्यावर छापा टाकून व्यवस्थापक इकरामा नासीर मुकादम यांच्यासह ८ जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून संगणक, एक लॅपटॉप, ११ हार्डडिक्स, १ सर्व्हर, १२ मोबाईल फोन, वायफाय राऊटर जप्त केले आहे.

- Advertisement -

ग्राहकांना फेक कॉल केले

या ठिकाणी अमेरिकेत व्हीओआयपी (व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल)च्या मार्फत कॉल करून तेथील नागरिकांना यू. एस. फार्मसी अमेरिका येथून बोलत असल्याचे खोटे सांगून अमेरिकन नागरिकांकडून शक्तीवर्धक औषधांची ऑर्डर घेऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळून त्यांची फसवणूक करीत होते, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आठही जणांना अटक केली आहे. कॉल सेंटर चालवणारा मुख्य आरोपी फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -