घरमुंबईकुवरपाडा जिप शाळेच्या तुटलेल्या पत्र्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कुवरपाडा जिप शाळेच्या तुटलेल्या पत्र्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Subscribe

कुवरपाडा जिल्हा परिषदेच्या इमारतीचे पत्रे तुटले असल्याने त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही

गेल्या परतीच्या वारा पावसाने जांभा येथील कुवरपाडा जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर झाड पडून छतावरील सिमेंट पत्रे, दोन पिलर तुटले आहेत. अनेक महिने उलटून गेले तरी छताची डागडुजी करण्यात न आल्याने विद्यार्थ्यांना तुटक्या छताखाली बसून अभ्यास करावा लागत आहे.

कुवरपाडा जिल्हा परिषद शाळेत इ. 1 ली ते 5 वीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील सर्वच विद्यार्थी गरीब आदिवासी कुटुंबातील आहेत. परतीच्या पावसात सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे छतावरील सिमेंट पत्रे फुटले आहेत. पालकांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत प्रस्ताव मांडून या शाळेतील इमारतीवरील फुटलेले सिमेंट पत्रे बदलून नवीन बसवण्याचा ठराव संमत केला आहे.

- Advertisement -

ठराव करून अनेक दिवस उलटूनही ग्रामपंचायत लक्ष देत नाही. जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागानेही याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना फुटलेल्या छपराखाली बसावे लागत आहे. इमारतीवरील सिमेंट पत्रे लवकरात लवकर बदलून इमारतीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पालक आणि गावकर्‍यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -