भाईंदरमध्ये भिंत पडून कामगाराचा मृत्यू

( पाच दिवसांपूर्वीच झाली होती मुलगी तिचा आनंद व्यक्त करतानाच दुर्दैवी घटना

Laborer dies after wall collapses in Bhayander

भाईंदर :- भाईंदर पश्चिमेला टेम्बा रुग्णालयाच्या पाठीमागे पपैय्या मैदानात एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी एक भिंत बनवण्यात आली होती, तीच भिंत पडून एका शैलेश गुप्ता (२५ ) वर्षीय या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मयताच्या घरच्यांनी पोलिसांनी सदरील मृत्यूची तपासून कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

भाईंदर पश्चिमेच्या पपैय्या मैदानात दोन दिवसापूर्वी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमासाठी स्टेजच्या बाजूला एक भिंत बनवण्यात आली होती. ती भिंत तोडण्यासाठी शैलेश गुप्ता हा मजूर सोमवारी गेला होता. तो रात्री घरी आला नाही म्हणून त्याच्या नातेवाईकांनी चौकशी केली असता मंगळवारी दुपारी शैलेशचा त्या भिंतीच्या खाली मृतदेह आढळून आला.

शैलेशला पाच दिवसांपूर्वी मुलगी झाली होती. मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त करत असतानाच शैलेशचा मृत्यू झाला आहे. पाच दिवसाच्या मुलीचे वडिलांचे डोक्यावरचे छत्र हरवल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. शैलेशचा मृत्यू भिंत पडून झाला की कोणी हत्या केली याचा तपास पोलिसांनी करून गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.


वादात लक्ष घालण्याचे शहा यांचे आश्वासन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती