घरमुंबईठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात अनास्थेचे प्रयोग सुरूच

ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात अनास्थेचे प्रयोग सुरूच

Subscribe

ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटयगृहातील दुरवस्था अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे.

कधी छत कोसळल्याने, तर कधी एसी बंद असल्याने ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटयगृहातील दुरावस्था कलाकरांनी नेहमीच चव्हाटयावर आणली आहे. सोमवारीही कलाकार विजू माने यांनी नाटयगृहातील दुरावस्थेवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. नाटयगृहातील लिफ्ट बंद झाल्याने ते अडकून पडले होते. अखेर सुरक्षाकर्मीच्या अथक प्रयत्नामुळे त्यांची सुखरूप सुटका झाली. आज माझ्यावरचा जीवघेणा प्रसंग टळला. मात्र, उद्याचं काही माहिती नाही, असे फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे. त्यामुळे घाणेकर नाटयगृहातील हे अनास्थेचे प्रयोग थांबणार कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठाणे महापालिकेला जाग कधी येणार?

ठाणे शहरात गडकरी रंगायतन हे एकमेव नाटयगृह असल्याने नाटयप्रेमींच्या सोयीसाठी डॉ. काशिनाथ घाणेकर हे नाटयगृह उभारण्यात आलं आहे. मात्र, नाटयगृहातील गैरसोयीबद्दल अनेकवेळा कलाकारांनी नाराजी व्यक्त करीत पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. मात्र, त्यातून प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी कोणताही धडा घेतलेला दिसून येत नाही. मराठी दिग्दर्शक विजू माने हे एका कार्यक्रमानिमित्त नाटयगृहात गेले होते. व्हिआयपी लिफटने कार्यक्रमस्थळी जात असतानाच, अचानक लिफ्ट बंद पडली. त्यामुळे अर्ध्यावरच ते अडकून पडले, त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना बाहेर पडता आले नाही. अखेर सुरक्षाकर्मीच्या अथक प्रयत्नानंतर माने लिफट मधून सुखरूप बाहेर आले. त्यामुळे त्यांनी नाटयगृहाच्या दुरावस्थेवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाटयगृह आणि दुरावस्था ही युती कधीच तुटणार नाही. आज माझ्यावरचा जीवघेणा प्रसंग टळला. मात्र, उद्याचे काही माहित नाही, असे त्यांनी फेसबुकवर लिहिले आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मात्र, नाटयगृहाची लिफ्ट अनेक दिवसांपासून खराब असल्याचे कर्मचाऱ्यांकडून त्यांना सांगण्यात आले. यापूर्वीही अभिनेता सुमीत राघवन यांने नाट्यगृहाच्या दुरावस्थेबद्दल सोशल मिडीयावर गेरसोयीचा पाढा वाचला होता. नाट्यगृहातील एसी बंद असल्याने अभिनेता भरत जाधव यांनेही फेसबूकवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच यापूर्वी प्रेक्षागृहातील शेवटच्या खुच्यावरील छत कोसळल्याची घटना घडली आहे, सुदैवाने यावेळी कोणीही नसल्याने दुर्घटना घडली नाही. त्यामुळे माने यांच्या घटनेनंतर तरी ठाणे महापालिकेला जाग येणार का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतील २१ टक्के शालेय विद्यार्थी स्थुलत्वाचे शिकार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -