घरक्राइमLalbaug Murder- क्राईम पेट्रॉल बघून मुलीने केले आईच्या मृतदेहाचे तुकडे

Lalbaug Murder- क्राईम पेट्रॉल बघून मुलीने केले आईच्या मृतदेहाचे तुकडे

Subscribe

आरोपी रिंपल जैन हीने क्राईम पेट्रोल ही सिरियल बघून आईच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील लालबाग येथे तीन महिन्यांपूर्वी मुलगी रिंपल जैन हीने जन्मदात्या आईची वीणा जैनची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची भयंकर घटना घडल्याचे समोर आले. तेव्हापासून या घटनेबद्दल रोज नवीन माहिती समोर येत आहे. आरोपी रिंपल जैन हीने क्राईम पेट्रोल ही सिरियल बघून आईच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

आरोपी रिंपल ही क्राईम पेट्रॉल सिरियल नियमित बघायची. त्यातूनच तिला आईच्या मृतदेहाचे तुकडे करण्याची कल्पना सुचल्याचे तिने पोलिसांना सांगितले. दरम्यान, रिंपलच्या आईच्या मृत्यूचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसून पोलीस पोस्टमोर्टम अहवालाची प्रतिक्षा करत आहेत. त्यातूनच या हत्येचे गूढ उलगडणार आहे. याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यात वेंडर, सेल्समन आणि घटनास्थळाच्या तळमजल्यावरील हॉटेल कर्मचाऱ्यांची पोलीस चौकशी करत आहेत.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार वीणा जैन यांचा मृत्यू २७ डिसेंबरला झाला. याचदिवशी त्या इमारतीच्या पहील्या मजल्यावरून खाली पडल्या. त्यानंतर इमारतीच्या तळमजल्यावरील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोन वेटरनी त्यांना घरी आणले. त्याच दिवशी रिंपलने फिनाईल, आणि रुम फ्रेशनर पण मोठया संख्येने खरेदी केले होते.

तसेच तपासादरम्यान घटनास्थळावरून पोलिसांना मार्बल कापणारी मशीनही सापडली आहे. यामुळे या घटनेचे गूढही वाढले आहे. वीणा जैन यांचा मृत्यू इमारतीवरून खाली पडल्याने झाला होता की नंतर रिंपलनेच त्यांची हत्या केली हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.

- Advertisement -

रिंपलने बारावीत असतानाच शिक्षण सोडले होते. २० वर्षांपूर्वीच तिच्या वडीलांचे निधन झाले. तेव्हापासून ती आईबरोबर लालबाग येथे राहत होती. सुरुवातीला तिने आईची हत्या केल्याचा आरोप फेटाळून लावला होता. मात्र इमारतीवरून पडल्याने आई गंभीर जखमी झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले होते. तर रिंपलनेच आईची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते तीन महिने कपाटात आणि पाण्याच्या टाकीत लवपून ठेवल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -