घरमुंबईLalbaugcha Raja : भक्तांची श्रद्धा, लालबागच्या राजाच्या चरणी 'इतके' किलो सोने आणि...

Lalbaugcha Raja : भक्तांची श्रद्धा, लालबागच्या राजाच्या चरणी ‘इतके’ किलो सोने आणि चांदी दान

Subscribe

नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी तब्बल 5 कोटी 16 लाख रुपयांचे दान जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय काही तोळे सोने आणि चांदी देखील लालबागच्या राजाला दान करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई : नुकताच गणेशोत्सव हा सण पार पडला आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा लालबागच्या राजाचीच सर्वाधिक चर्चा पाहायला मिळाली. चिंचपोकळीमध्ये असलेला लालबागचा राजा हा ‘नवसाला पावणारा’ गणपती म्हणून ओळखला जातो. ज्यामुळे देशभरातील अनेक गणेशभक्त या ठिकाणी येतात. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी नागरिक अनेक तास लाईनमध्ये उभे राहतात आणि राजाचे दर्शन घेतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनाला निघालेला लालबागचा राजा यंदाच्या वर्षी 23 तासांनंतर म्हणजेच दुसऱ्या दिवशी विसर्जीत झाला. नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असलेल्या या गणपतीच्या चरणी तब्बल 5 कोटी 16 लाख रुपयांचे दान जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय काही तोळे सोने आणि चांदी देखील लालबागच्या राजाला दान करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. (Lalbaugcha Raja : donation of kilos of gold and silver at the feet of the Raja of Lalbaug)

हेही वाचा – गडकिल्ले, धार्मिक स्थळांच्या परिसरातही स्वच्छता आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisement -

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळाकडून लालबागच्या राजाला दान स्वरुपात आलेल्या वस्तुंचा लिलाव करण्यात येणार आहे. त्याआधी राजाच्या चरणी दान करण्यात आलेल्या देणगीबाबतची माहिती मंडळाकडून जाहीर करण्यात येते. त्यानुसार, दहा दिवसांमध्ये लालबागच्या राजाच्या चरणी पाच कोटी सोळा लाख रुपये रोख रक्कमेचे दान गणेश भक्तांकडून करण्यात आले आहे. तर साडेतीन किलो सोने आणि 64 किलो चांदी यावेळी लालबागच्या राजाच्या चरणी दान करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या दान पेट्यांमध्ये काही गणेश भक्तांकडून चिठ्ठ्या देखील टाकल्या जातात, या चिठ्ठ्यांमध्ये गणेश भक्त आपल्या मनातील भावना राजाला सांगतात.

यावर्षी किती दान?

लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव हा काल (ता. 1 ऑक्टोबर) पार पडला आहे. यावेळी जवळपास एक किलोचा सोन्याचा हार, चांदीची गदा, सोने-चांदीचे मोदक, चांदीचा मूषक राज, चांदीचे नारळ, चांदीचे ताट, विविध पूजेची सामग्री, चांदीचे छत, चांदीचा कळस, सोन्या चांदीची नाणी, सोनेरी गुलाबाचा हार, चांदीची पंक्ती, छोटे मोठे चांदीचे गणपती, सीजन क्रिकेट बॅट ,सोन्याचा मुलामा दिलेला चांदीच मुकूट भक्तांनी अर्पण करण्यात आले आहे. तसेच या वर्षी इलेक्ट्रीक बाईक सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. राजाला चक्क एका भक्ताने इलेक्ट्रिक बाईक दान केली आहे. लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तू घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -