घरमुंबईतब्बल २२ तासांनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन

तब्बल २२ तासांनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन

Subscribe

मुंबईचा मानाचा गणपती लालबागच्या राजाचे अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आले आहे. विसर्जनासाठी गिरगाव चैपाटीवर लाखो भक्तांची अलोट गर्दी जमा झाली होती. गेल्या २२ तासांपासून लालबागच्या राजाची मोठ्या थाटात आणि जल्लोषात विसर्जन मिरवणूक सुरु होती. दरम्यान, या मिरवणुकीत ठिकठिकाणी बाप्पावर देखणी अशी पुष्पवृष्टी करण्यात आली. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भक्त येतात. राजाच्या दर्शनासाठी लाखो लोक तासंतास ताटकळत उभे असतात. बाप्पाच्या दर्शनानंतर भक्तांना मोठा दिलासा मिळतो. लालबागच्या राजाजवळ कोणतीही इच्छा मनोभावानी मागितली तर ती पूर्ण होते. त्यामुळे नवसाला पावणारा लालबागचा राजा, अशी महती लालबागच्या राजाची आहे. त्यामुळेच गेले दहा दिवस ज्या भक्तांना बाप्पाचे दर्शन घेता आले नाही, ते गिरगाव चौपाटीवर आज सकाळी हजर होते. बाप्पाचे रुप डोळ्यांत साठवण्यासाठी गिरगाव चौपाटीवर आज उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे पुत्र अनंत अंबानी देखील उपस्थित होते.

सर्वसामान्य ते सेलेब्रेटी राजाच्या दर्शनासाठी 

लालबागचा राजाचे हे ८६ वे वर्ष होते. गेल्या दहा दिवसांत राजाच्या दर्शनासाठी सर्वसामान्य नागरिक ते मोठमोठे उद्योगपती, सेलेब्रेटींनी दर्शन घेतले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील राजाचे दर्शन घेतले. अमित शहा यांनी गेल्यावर्षी देखील राजाचे दर्शन घेतले होते. यावर्षी गृहमंत्री झाल्यानंतरही ते फक्त राजाच्या दर्शनासाठी मुंबईला आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -