घरमुंबईगणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दरबारात वाद, महिला सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दरबारात वाद, महिला सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की

Subscribe

आज गणेश चर्तुर्थीच्या दिवशी लालबागच्या राजाचे दर्शन घेत असताना मंडप परिसरात एक अप्रिय घटना घडली आहे.

गणपती म्हणजे मुंबईचा आराध्य दैवत आणि मुंबईच्या गणेशोत्सवाचा(ganeshotsav 2022) एक वेगळाच उत्साह सर्वत्र असतो. कोरोनामुळे मागील दोन वर्षे कोणत्याच प्रकारचे सण उत्सव साजरे केले नव्हते. पण यावर्षी मात्र इतर सण आणि गणेशोत्सव अगदी उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा करण्यात येत आहे. लालबागचा राजा म्हणजे अनेकांचं दैवत लालबागच्या राजाच्या(lalbaugcha raja) दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. मागच्या दोन वर्षांची कसर भरून काढण्यासाठी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असलेली पाहायला मिळत आहे. आज गणेश चर्तुर्थीच्या दिवशी लालबागच्या राजाचे दर्शन घेत असताना मंडप परिसरात एक अप्रिय घटना घडली आहे.

हे ही वाचा –  महाराष्ट्रातील, देशातील सर्व विघ्न विघ्नहर्त्याने दूर करावेत, देवेंद्र फडणवीसांचं बाप्पाला साकडं

- Advertisement -

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी काल रात्रीपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. लालबागच्य राजाच्या दरबारात भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये वाद झाला. लालबागच्या राजाच्या मुखदर्शनच्या रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेमध्ये आणि काही महिला सुरक्षारक्षकांमध्ये हा वाद झाला. यावेळी गणेशाच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेने महिला सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर या वादात पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या घटनेमुळे लालबागच्या राजाच्या दरबारात काही काळ तणावाचे वातावरण तयार झाल्याचे पाहायला मिळाले .
हे ही वाचा – लालबागच्या राजाचा प्रसादही मिळणार ऑनलाइन, ‘अशी’ नोंदवा ऑर्डर

आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आणि तब्बल दोन वर्षांनी गणेशोत्सव मोठया जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लांब रांगा लागल्या आहेत. अशातच काही महिला दर्शन घेण्यासाठी अधिक काळ थांबायचा प्रयत्न करत होत्या. पण पोलिसांकडून गर्दी पाहता कोणालाच थांबू दिलं जात नाही आहे. या कारणावरुन दर्शनासाठी आलेली महिला आणि महिला सुरक्षारक्षकांमध्ये वाद झालेली आहे. यावेळी महिलेने सुरक्षारक्षक असलेल्या महिलेला धक्काबुक्की केल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी या वादग्रस्त परिस्थितीवर नियंत्रण मिळवून परिस्थिती पूर्ववत केली.

- Advertisement -

हे ही वाचा –  मुंबईच्या रेल्वेस्थानकांवर अवतरणार ‘मेघदूत’, करणार हवेतून पाण्याची निर्मिती

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -