घरमुंबईपोलीस कॉन्स्टेबल लवकरच ललिता होणार ललित साळवे, शस्त्रक्रियेसाठी ललिता सेंट जॉर्जमध्ये दाखल

पोलीस कॉन्स्टेबल लवकरच ललिता होणार ललित साळवे, शस्त्रक्रियेसाठी ललिता सेंट जॉर्जमध्ये दाखल

Subscribe

बीडची महिला पोलीस कॉस्टेंबल ललिता साळवे आता होणार लवकरच ललीत साळवे 

पोलिसांनी लिंग बदलाला दिलेल्या परवानगीनंतर ललिता मुंबईच्या सेंट जाॅर्ज रूग्णालयात दाखल झाली आहे. येत्या काही दिवसात तिच्यावर लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. पोलीस खात्यात कॉस्टेंबल असलेल्या ललिताला या ऑपरेशनच्या परवानगीसाठी आणि लिंग बदलल्या नंतर खात्यात कायम राहण्यासाठी मोठा लढा द्यावा लागला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी ललिताच्या केस कडे सहानभूतीने बघण्याचे निर्देश दिल्यानंतर ललिताचा ललीत बनण्याचा मार्ग मोकळा झाला. आता तिच्यावर पुढचे उपचार सेंट जॉर्जमध्ये सुरू होतील, अशी माहिती ललिताचे मामा अर्जुन उजागरे यांनी दिली. ललिताचा ललीत होण्यासाठीचा हा प्रवास फार कठीण होता असल्याचे सांगत ती आता ललितकुमार होईल असेही तिच्या मामांनी सांगितले.

- Advertisement -

नेमकं काय आहे प्रकरण –

माजलगाव शहर पोलीसात कार्यरत असलेल्‍या महिला पोलिस ललिता साळवेला गेल्या अनेक वर्षांपासून शरीरात होणाऱ्या हार्मोन्स बदलामुळे लिंगबदल करण्याची इच्छा होती. यासाठी तिने पोलीस खात्याकडे परवानगी मागितली होती. मात्र, ललिता ही भरतीच्या वेळी महिला म्हणून भरती झाली असून लिंगबदल केल्यास पुरुष झाल्याने तिच्या नोकरीवर गदा येण्याची शक्‍यता होती. त्‍यामुळे ललिताने मुंबई उच्च न्यायालयात ॲड. अब्बास नक्वी यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती. शरीरात बदल करण्याचा नैसर्गिक अधिकार असल्याने न्यायालयाने तिच्या लिंगबदलाला परवानगी दिली होती. मात्र, गृहविभागात ही पहिलीच बाब आसल्याने तांत्रिक अडचणी  निर्माण झाल्या होत्‍या. ललिताच्या या मागणीमुळे पोलिस खात्यापुढे पेच निर्माण झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र  फडवणीस यांनी हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने याबाबत सहानभुती पूर्वक विचार करण्याचे आदेश गृह विभागाला दिले. मागील महिन्यात तामिळनाडू राज्यातील एका तृतिय  पंथीयाबाबतीत घेतलेल्‍या निर्णयाच्या आधारे पोलीस खात्याने ललिताला दिलासा देणारा निर्णय घेतला.

- Advertisement -

या सर्व घडामोडीनंतर महासंचालक सतीश माथुर यांनी गृहविभागाचा हा आदेश बीड जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीधर यांना दिला.  दरम्‍यान, या परवानगीचे पत्र मिळाल्यानंतर ललिता लिंगबदल शस्ञक्रियेसाठी मुंबईला रवाना झाली आहे. लिंगपरिवर्तनानंतर ललिताची आवडीची पोलीसदलातील नोकरी कायम राहणार असल्याने तिने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस अधिक्षक श्रीधर यांच्यासह संपूर्ण पोलीस दलाचे आभार व्यक्त केले.

माझं स्वप्नं आता पूर्ण होणार आहे. लवकरच मी ललितापासून ललित बनणार आहे. ज्या दिवसाची मी वाट पाहत होते तो दिवस आता येणार आहे, असं ललिता यांनी सांगितलं आहे. “आता शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी मंगळवारी सेंट जॉर्ज रुग्णालयात आलीये. यासाठी मला माझ्या कुटुंबाने आणि मित्रपरिवाराने खूप पाठिंबा दिलाय. सध्या माझ्या काही चाचण्या करण्यात येतायत. लिंगपरिवर्तनाची शस्त्रक्रिया कधी होणार याबाबत अद्यापही तारीख ठरवण्यात आलेली नाहीये.”

ललिता साळवे, पोलीस कॉन्स्टेबल

सेंट जॉर्ज रूग्णालयाच्या प्रशासनाकडून ललिताला विशेष सेवा पुरवण्यात येतेय. ललितावर सध्या रुग्णालयातील तळमजल्यावरील एका स्वतंत्र खोलीत उपचार सुरु आहेत. सेंट जॉर्ज रूग्णालयाच्या प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉक्टर रजत कपूर ललितावर लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया करणार आहेत.

” अजून ललिताच्या लिंग बदल शस्त्रक्रियेबाबात विचार झालेला नाही. कारण अशी शस्त्रक्रिया करण्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डिएमईआर) ची परवानगी गरजेची असते. त्यानंतरच आम्ही ही शस्त्रक्रिया करू. पण त्यापूर्वी ललिता यांच्या जेनेटिक आणि काही रक्त चाचण्या करण्यात. येतील. या चाचणीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी कोणत्या गोष्टी लागतील आणि ही शस्त्रक्रिया कशाप्रकारे करता येईल, याचा अंदाज घेता येईल. याशिवाय शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ललिता यांची मानसिक व शारीरिक चाचण्या ही केल्या जातील. त्यानंतरच शस्त्रक्रिया केली जाईल.”

डॉ. रजत कपूर, प्लास्टिक सर्जरी विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -