घरताज्या घडामोडीवसईत दरड कोसळली; दोन जणांचा मृत्यू, एनडीआरएफ दाखल, चार जण बचावले

वसईत दरड कोसळली; दोन जणांचा मृत्यू, एनडीआरएफ दाखल, चार जण बचावले

Subscribe

मुंबईसह आसपासच्या परिसरा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) दरड कोसळ्याची घटना घडत आहे. त्यानुसार, वसईच्या राजवली वाघरल पाडा (Vasai Rain) या परिसरात दरड कोसळली आहे.

मुंबईसह आसपासच्या परिसरा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) दरड कोसळ्याची घटना घडत आहे. त्यानुसार, वसईच्या राजवली वाघरल पाडा (Vasai Rain) या परिसरात दरड कोसळली आहे. या दरडीखालून ६ जण अडकली होती. त्यापैकी ४ जणांची सुटका केल्याचे समजते. दरड कोसळ्याची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत बचाव कार्याला सुरूवात केली. (land slide at vasai rajvali waghral pada due to heavy rainfall)

मिळालेल्या माहितीनुसार, दरडीखाली अडकलेल्यांमध्ये मुलगा आणि त्याचे वडील असल्याचे समजते. बुधवारी सकाळपासून पावसाने जोर धरला. मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. वसईसह मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ढेकाळेजवळ दरड कोसळली आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून दरड हटवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

- Advertisement -

एमएमआरडीएच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम झाल्यानंतर खोदलेल्या टेकडीला कोणतीही संरक्षक भिंत तयार न केल्याने ही दरड कोसळल्याची माहिती मिळाली आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसापासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. यामुळे आज पहाटे पालघर तालुक्यातील सोमटा येथील परशुराम हाडळ यांचे घर कोसळले. घरासह घरातील सामग्रीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

भारतीय हवामान विभाग (IMD) आणि प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार १२ आणि १४ जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. पुढचे दिवस मुसळधार पाऊस असाच कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनाही काळजी घेण्याचं आणि सतर्कता बाळगण्याचं आवाहन केले जाते.


हेही वाचा – गुरुपौर्णिमा : ‘गुरूर’ भी वो ही…, संजय राऊत यांचे बाळासाहेबांना अभिवादन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -