घरताज्या घडामोडीमुंबईकरांनो सावधान! मागील एका आठवड्यात मलेरियाचे ७२ तर डेंग्यू ४७ रुग्ण

मुंबईकरांनो सावधान! मागील एका आठवड्यात मलेरियाचे ७२ तर डेंग्यू ४७ रुग्ण

Subscribe

सुदैवाने या आजारांनी कोणाचाही मृत्यू झालेला नाही

मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणेला गेल्या दीड वर्षांपासून भेडसावणाऱ्या कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. मात्र दुसरीकडे, मुंबईत साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. १ ते ७ नोव्हेंबर या आठवड्याभरात मलेरियाचे ७२, डेंग्यूचे ४७, गॅस्ट्रोचे ४९ चिकनगुनियाचे ६ व स्वाईन फ्ल्यू १ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबई महापलिका आरोग्य यंत्रणेला सजग व सुसज्ज राहावे लागत आहे. गेल्या मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाने तळ ठोकला आहे. कोरोनाची पहिली व दुसरी लाट परतावून लावण्यात आणि कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यात पालिका करोग्य यंत्रणेला चांगलेच यश आले आहे. मात्र गेल्या १ नोव्हेंबरपासून ते ७ नोव्हेंबर या सात दिवसांच्या कालावधीत शहर व उपनगरे या ठिकाणी मलेरियाचे ७२, गॅस्ट्रोचे ४९, डेंग्युचे ४७ आणि स्वाइन फ्ल्यू, लेप्टोचे प्रत्येकी १ अशा रुग्णांची नोंद झाली आहे.

सुदैवाने या आजारांनी कोणाचाही मृत्यू झालेला नाही.मात्र एकीकडे कोरोनाचा धोका कमी झाल्याने समाधान असताना आता त्यातच साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. पालिका यंत्रणेकडून साथीच्या आजारांना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र नागरिकांनीही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे. मुंबईकरांनो योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

१ ते ७ नोव्हेंबर आढळलेले रुग्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -