घरमुंबईप्रभूकुंजच्या भिंतीवर साकारणार लतादीदींचे भितीशिल्प

प्रभूकुंजच्या भिंतीवर साकारणार लतादीदींचे भितीशिल्प

Subscribe

लतादीदींच्या स्मृती प्रीत्यर्थ 'स्वरांचा कल्पवृक्ष’ हा स्मृतिस्तंभ मुंबई महापालिकेच्या वतीने व लोढा फाऊंडेशनच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे. या स्तंभाचे भूमिपूजन लतादीदींच्या भगिनी उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते व राज्याचे पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी करण्यात आले.

मुंबईः मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाचा भाग म्हणून, डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड) येथील मंगेशकर कुटुंबियांच्या ‘प्रभूकूंज’ या निवासस्थानाच्या दर्शनी भिंतीवर भारतरत्न लता मंगेशकर यांचे भित्तिशिल्प साकारण्यात येणार आहे. पर्यटन मंत्री तथा स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हे काम केले जाणार आहे.

तसेच लतादीदींच्या स्मृती प्रीत्यर्थ ‘स्वरांचा कल्पवृक्ष’ हा स्मृतिस्तंभ मुंबई महापालिकेच्या वतीने व लोढा फाऊंडेशनच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे. या स्तंभाचे भूमिपूजन लतादीदींची बहिण उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते व राज्याचे पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी करण्यात आले.

- Advertisement -

या भूमिपूजनप्रसंगी मीनाताई मंगेशकर-खडीकर, आदिनाथ मंगेशकर, प्रसिद्ध गायक नितीन मुकेश, प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स व इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अनंत सिंघानिया, मंगेशकर कुटुंबातील इतर सदस्य, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे व अन्य मान्यवर देखील उपस्थित होते.

भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांच्या प्रथम स्मृती दिनाचे औचित्य साधून हा छोटेखानी सोहळा पार पडला. डी विभागातील वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली जंक्शन, ताडदेव) येथील वाहतूक बेटामध्ये ‘स्वरांचा कल्पवृक्ष’ या संकल्पनेवर आधारित स्मृती स्तंभ उभारण्यात येणार आहे.

- Advertisement -

”स्वरांचा कल्पवृक्ष” स्तंभाची ठळक वैशिष्ट्ये

स्टील व खरेखुरे झाड यांचा वापर करून उभारणार ४० फूट उंच व १५ फुट रुंद ‘स्मृती स्तंभ’

झाडाच्या सतत वाढीस चालना देण्यासाठी पूर्णपणे मातीचा वापर करण्यात येणार आहे.

सदर स्तंभाच्या कलाकृतीतून धरतीचे आकाशाशी झालेले मीलन चित्रित करण्यात येणार आहे.

महापालिका व लोढा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने उभारणार स्वरांचा कल्पवृक्ष स्तंभ

‘प्रभूकूंज’ निवासस्थानाच्या दर्शनी भिंतीवरील भित्तिशिल्पाची ठळक वैशिष्ठ्ये

भित्तिशिल्पातून लता दीदींच्या जीवनप्रवासातील ठळक, विशेष उल्लेखनीय प्रसंग दर्शविणार

क्यू आर कोडच्या माध्यमातून लतादीदींच्या विशेष छबी, सादरीकरणाची चित्रणे, नावाजलेली अजरामर गीते, सहकार्‍यांची मनोगते इत्यादी बाबी अंतर्भूत करण्याचे देखील नियोजन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -