घरमुंबईअन्नत्यागाला परवानगी नाही, अभिषेक आंदोलनावर ठाम

अन्नत्यागाला परवानगी नाही, अभिषेक आंदोलनावर ठाम

Subscribe

गेल्या अनेक महिन्यांपासून निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या लॉ शाखेचा विद्यार्थी अभिषेक सावंत याला अन्नत्याग आंदोलनास विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती पुढे आली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या लॉ शाखेचा विद्यार्थी अभिषेक सावंत याला अन्नत्याग आंदोलनास विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात अभिषेकला पोलिसांनी समजावले आहे. कोणत्याही प्रकारचे आंदोलन करु नकोस, अशी ताकीदही देण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत निकाल देत नाही तोपर्यंत आपण आंदोलनावर ठाम आहोत, असे अभिषेक सावंत याने ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

मुंबई विद्यापीठातील लॉ शाखेचा विद्यार्थी असलेला अभिषेक सावंत याने नोव्हेंबर २०१७ रोजी लॉ अभ्यासक्रमाची ५ आणि ६ व्या सत्राची परीक्षा दिली होती. या परीक्षेत नापास झाल्याने त्याने पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. त्यात तो उत्तीर्ण झाला आहे. मात्र त्यानंतरही अभिषेकला त्याची गुणपत्रिका देण्यात आलेला नाही. अभिषेक सेमिस्टर चारच्या परीक्षेत नापास झाल्याने त्याला गुणपत्रिका देण्यात आलेली नसल्याचे कारण त्याला विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. पण प्रत्यक्षात अभिषेकने सेमिस्टर चारची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

- Advertisement -

त्याचा निकालदेखील त्याने विद्यापीठाकडे सुपुर्द केला आहे. मात्र त्यानंतरही त्याला सेमिस्टर पाच आणि सहाचा सुधारित निकाल मिळालेला नसल्याने त्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यामुळे त्याने १९ जुलै रोजी विद्यापीठात अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाच्या परवानगीसाठी मंगळवारी विद्यापीठात आणि पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र दोन्ही प्रशासनाने परवानगी नाकारल्याची माहिती अभिषेकने यानिमित्ताने दिली आहे. याबद्दल बोलताना अभिषेक सावंत म्हणाला की, या अगोदर अनेकवेळा विद्यापीठात निकालासाठी गेलो आहे. मात्र फक्त आश्वासनच मिळाले आहे. म्हणून आंदोलन करीत आहे, मात्र त्यासाठी प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. मात्र त्यानंतरही मी आंदोलन करणार असून उद्यापर्यंत प्रशासनाच्या उत्तराची वाट बघीन, त्यानंतर पुढचे पाऊल उचलीन, असे त्याने यावेळी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -