घरक्राइमसलमानला काळवीटची शिकार भोवू शकते; गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची पुन्हा धमकी

सलमानला काळवीटची शिकार भोवू शकते; गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची पुन्हा धमकी

Subscribe

गेल्या वर्षी सलमानला धमकीचे पत्र आले होते. यासाठी मुंबई पोलीस माझी चौकशी करायला आले होते. मात्र मी काही धमकीचे पत्र पाठवले नव्हते. तसे कोणतेच पत्र मिळालेले नाही, असा खुलासाही लॉरेन्सने केला आहे.

मुंबईः अभिनेता सलमान खानने काळवीट शिकार प्रकरणात चूक केली आहे. त्यामुळे आमच्या समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. यासाठी एकदा तरी सलमानने माफी मागावी असे आमचे म्हणणे आहे. त्याने माफी मागितली नाही तर आम्हाला आमच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल, असा धमकी वजा इशारा लॉरेन्स बिश्नोईने दिला आहे.

एबीपी न्यूज या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लॉरेन्सने ही धमकी दिली आहे. तो म्हणाला, सलमानने काळवीट शिकार प्रकरणात चूक केली आहे. आमच्या समाजाचा त्याने अपमान केला आहे. मला काही समाजाने पाठिंबा दिलेला नाही. मात्र त्याने माफी मागणे अपेक्षित आहे. ही धमकी न समजता विनंती समजून सलमानने माफी मागावी.

- Advertisement -

गेल्या वर्षी सलमानला धमकीचे पत्र आले होते. यासाठी मुंबई पोलीस माझी चौकशी करायला आले होते. मी काही धमकीचे पत्र पाठवले नव्हते. तसे कोणतेच पत्र मिळालेले नाही, असा खुलासाही लॉरेन्सने केला आहे.

पंजाबमधील गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या झाल्यानंतर सलमानला धमकीचे पत्र मिळाले होते. सलमानला धमकी आल्यामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती.  मुंबईच्या गुन्हे शाखेकडून याची चौकशी झाली. दिल्लीपर्यंत ही चौकशी करण्यात आली आहे. दिल्लीत मुंबईच्या गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत हे पत्र विक्रम बराड याने दिल्याचे समोर आले होते. नंतर विक्रम बराड हा लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमधील असल्याचे स्पष्ट झाले होते. तो बिश्नोईचा खास सहकारी असून त्याच्यावर तब्बल दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

- Advertisement -

सलमानला धमकी देण्यासाठी तीन जण मुंबईत आले होते. सौरभ महाकालला हे तिघेजण भेटले होते. महाकालची मुंबई गुन्हे शाखेने तब्बल सहा तास चौकशी केली होती. प्रसिद्धीसाठी ही धमकी दिल्याचे चौकशीतून समोर आले होते. मात्र आता पुन्हा एकदा लॉरेन्सने सलमानला इशारा वजा धमकी दिली आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -