घरमुंबई'या साठी' जेलमधल्या विविध दिग्गज नेत्यांनी केले कोर्टात अर्ज

‘या साठी’ जेलमधल्या विविध दिग्गज नेत्यांनी केले कोर्टात अर्ज

Subscribe

नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. यामुळे त्यांना तातडीने स्ट्रेचरवरून जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, खासदार नवनीत राणा विविध आरोपांखाली जेलमध्ये आहेत. हे तीनही नेते कोणत्या न कोणत्या शारीरिक व्याधीने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांनी कोर्टात उपचारासाठी अर्ज केला आहे.

नवनीत राणा यांनी आपल्याला तातडीने उपचारास परवानगी मिळवी, असा भायखळा कारागृहाकडे अर्ज दाखल केला आहे. राणा यांना मणक्याच्या व्याधीचा त्रास असून कारागृहात जास्त वेळ जमिनीवर बसून आणि झोपून हा त्रास आणखी बळावला आहे. त्यांना 27 फेब्रुवारीला उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे राणा यांचा सिटी स्कॅन करण्यात यावा, असे सांगितले होते. याबद्दल कारागृहातील अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisement -

नवाब मलिक यांची जेलमध्ये प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाली आहे. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. यामुळे त्यांना तातडीने स्ट्रेचरवरून जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच रिमांडला विरोध करण्यासाठी नवाब मलिक यांनी अर्ज दाखल केला होता. स्टेज II च्या क्रॉनिक किडनी रोगामुळे त्यांना पाय दुखणे आणि सूज येण्याची तक्रार आहे. तुरुंगात त्यांना वेदनाशामक औषध देण्यात आले आहे, जे या रोगासाठी चांगले नाही. जे.जे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना औषध दिली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

अनिल देशमुख हे गेल्या काही महिन्यांपासून कारागृहातच आहेत. त्यांना खांदेदुखीचा त्रास सतावत आहे. त्यामुळे त्यांनी उपचारासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर 4 मे रोजी सुनावणी होणार आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -