CoronaVirus: कोरोना बाधित क्षेत्रात चेंबूर, देवनार आघाडीवर!

कोरोना बाधित क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर भायखळ, चिंचपोकळी हे विभाग आहेत.

Over 1,400 new coronavirus cases in 24 hours take India’s tally past 21,000

कोरोना रुग्ण आढळून आलेल्या इमारतीसह परिसराला महापालिकेच्या माध्यमातून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून संपूर्ण मुंबईत दिवसभरात १४६ क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आली आहे. ज्यामध्ये एकट्या देवनार चेंबूर परिसरातच २१ ठिकाणे ही कंटेमेटेड झोनमधून जाहीर झालेली आहेत. तर त्या खालोखाल भायखळा चिंचपोकळी या ई विभाग कार्यालयाचा समावेश आहे. या परिसरात एकूण २० क्षेत्र प्रतिबंधित घोषित करण्यात आली आहे.

नागरिकांना त्या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात येतो

मुंबईत सध्या कोरोनाच्या विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने होऊ लागला असून एका दिवसांतच बाधित रुग्णांची संख्या १००ने वाढली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब असली तरी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सर्वप्रकारच्या सावधानता बाळगत सुरक्षिततेच्यादृष्टीकोनातून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे कोरोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याठिकाणचा इमारतीसह आसपासचा परिसर सिल करून तेथील रहिवाशांना तसेच आसपासच्या नागरिकांना त्या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात येतो. त्यामुळे आतापर्यंत ज्या ज्या इमारतींमध्ये अशाप्रकारचे रुग्ण आढळून आले आहेत, अशा इमारतींसह आसपासचा परिसरही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येत आहे.

जास्त प्रतिबंधित ‘हे’ पाच वॉर्ड

आतापर्यंत सर्वांत जास्त प्रतिबंधित क्षेत्र पाच टॉप फाईव्ह वॉर्डांमध्ये चेंबूर, देवनार( एम-पश्चिम विभाग) : २१,
भायखळा, नागपाडा (ई विभाग) : २०, घाटकोपर (एन विभाग) :१४,  मलबारहिल, वाळकेश्वर ग्रॅटरोड (डि विभाग) : ११,  वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम परिसर (एच पश्चिम) : ११ आदींचा समावेश होत आहे. महापालिकेच्या २४ विभागांमध्ये कोरोनामुळे अशाप्रकारचे एकूण १४६ प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून त्याठिकाणी संबंधित विभागाच्या सहायक आयुक्तांच्या माध्यमातून फलक लावण्यात आले आहेत. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची काळजी तसेच त्यांना घरपोच सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंसह इतर सुविधा देण्याची जबाबदारीही महापालिकेने उचलली आहे.

घाटकोपरमधील दाम्पत्याला पाठवले हॉटेल

घाटकोपरमधील एका दाम्पत्याला होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही संबंधित दाम्पत्य बाहेर फिरत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांसह त्यांच्या घरी जाऊन त्यांना स्टेशनजवळील हॉटेलरमध्ये व्यवस्था केली. सुरुवातीला हे दाम्पत्य जाण्यास तयार नव्हते. परंतु अधिकाऱ्यांनी नम्र भाषेत सांगितल्यानंतर ते तयार झाले आणि हॉटेलमधील सुविधा पाहून ते अधिकच खुश झाले.

महापालिकेचे टॉप फाईव्ह प्रतिबंधित क्षेत्र

चेंबूर,देवनार( एम-पश्चिम विभाग) : २१
मुक्ती नगर केळकर वाडी, देवनार अग्निशमन दल केंद्र परिसर,  त्रिशुल बिल्डींग, चेंबूर हाईट्स, गुड अर्थ सोसायटी आदी २१ ठिकाणी प्रतिबंधित करण्यात आली आहे.

भायखळा, नागपाडा  (ई विभाग) : २०
चिंचपोकळी विष्णू पिंगळे रोड, स्टेबल स्ट्रीट, मोमिनपुरा बीआयटी चाळ, बेलासीस रोड, लोखंड बाजार, जगजीवनराम हॉस्पीटल कर्मचारी वसाहत, सरबतवाला बिल्डींग, मस्कावाला मॅन्शन आदी २० ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आली आहे.

घाटकोपर (एन विभाग) :१४
संघर्ष क्रीडा मंडळ, जयभवानी स्पोर्ट क्लब, परेरा चाळ, भटवाडी बर्वे नगर कॉलोनी, पंत नगर, निळकंठ इमारत,  पंत नगर शास्त्री नगर, पंत नगर आंबेडकर चौक, भटवाडी न्यू दया सागर आदी १४ ठिकाणे नागरिकांसाठी तसेच रहिवाशांसाठी प्रतिबंधित करण्यात आली आहेत.

मलबारहिल, वाळकेश्वर ग्रॅटरोड (डि विभाग) : ११
मलबार हिल रिगे रोड, वाळकेश्वर रोड गोएंका हाऊस, पेडर रोड पदम  निवास, आर्चिड टॉवर, कॅडबरी हाऊस नॅशनल गॅरेज जवळ, डि वॉर्ड महापालिका कार्यालय परिसरातील ऑरबिट हाईट, जसलोक जवळी दिया मॅन्शन आदी ११ प्रतिबंधित ठिकाणे जाहीर  करण्यात आली.

वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम परिसर (एच पश्चिम) : ११
आईस फॅक्टर रोड, एस.व्ही.रोड खार पश्चिम, खोतवाडी १० वा रस्ता, वांद्रे पश्चिम बी.जे रोड, सांताक्रुझ पश्चिम वेस्ट एव्हेन्यू रोड, हिल रोड आदी ११ ठिकाणी प्रतिबंधित करण्यात आली आहे.


हेही वाचा – CoronaVirus : आता दादरमधील घाऊक बाजार पूर्णपणेच बंद