घरताज्या घडामोडीआरेत बिबट्याची दहशत! युनिट नंबर ७ येथे पुन्हा बिबट्याचा हल्ला

आरेत बिबट्याची दहशत! युनिट नंबर ७ येथे पुन्हा बिबट्याचा हल्ला

Subscribe

गेल्या १५ दिवसांमध्ये बिबट्याने पाच वेळा हल्ले केले

मुंबईत गोरेगाव आरे (Aarey) येथे बिबट्यांचे हल्ले सुरुच आहेत. आरेत घराबाहेर बसलेल्या ६० वर्षींय आजीवर बिबट्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा आरेत बिबट्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला असून तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर ट्रामा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरे दुग्ध वसाहतीतील युनिट नंबर ७ (Unit No. 7 in Aarey Milk Colony) येथील धक्कादायक घटना आहे. गोरेगाव पूर्व संतोष नगर येथे राहणारा राजेश नामक एक तरुण आरे दुग्ध वसाहत ७ फिल्म सिटी रोड पंजाब ढाबा सुनील मैदान येथे आपल्या मित्राला सोडण्यासाठी आला होता. यावेळी तरुणावर बिबट्याने जोरदार हल्ला चढवला. तरुणाला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते निलेश धुरी यांनी दिली आहे.

- Advertisement -

आरे येथे सतत होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे तिथले स्थानिक नागरिक आपला जीव मुठीत धरुन राहत आहेत. एक दिवसापूर्वीच दुग्ध शाळेसमोरिल विसावा या ठिकाणी घराच्या पडवीत बसलेल्या ६० वर्षांच्या आजींवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यामुळे आरेतील लोक बिबट्यापासून घाबरुन होते.

- Advertisement -

गेल्या १५ दिवसांमध्ये बिबट्याने पाच वेळा हल्ले केले आहेत. पहिला हल्ला २६ सप्टेंबर रोजी युनिट नंबर ३ येथे करण्यात आला. ज्यात ४ वर्षांच्या बालकावर रात्री ८ वाजताच्या सुमारास हल्ला करुन बालकाला जखमी केली. त्या बाळावर सध्या जोगेश्वरी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यानंतर त्याच रात्री युनिट नंबर ३१ येथील एकता नगर झोपडपट्टीतील एका घरात बिबट्या शिरला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी युनिट नंबर २२ येथे बिबट्याचे पिल्लू सापडले.


आरे येथे वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट आहे. नागरीक जीव मुठीत धुरुन राहत आहेत. स्थानिकांकडून बिबट्याच्या बंदोबस्ताच्या मागणीचा जोर वाढला आहे. त्यानुसार वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी जागोजागी सापळे लावण्यात आले आहेत.


हेही वाचा – ब्राम्हणगाव : उंबर पांदीत बिबट्याची दहशत, गावकरी धास्तावले

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -