घरमुंबईमुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये आढळला मृतावस्थेत बिबट्या; शिकारीची शक्यता वनविभागाने नाकारली

मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये आढळला मृतावस्थेत बिबट्या; शिकारीची शक्यता वनविभागाने नाकारली

Subscribe

मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये रविवारी एका बिबट्याने आठ ते नऊ महिन्यांचे पिल्लू मृतावस्थेत आढळले आहे. दरम्यान वनविभागाने बिबट्याच्या शरीरावरील कोणताही भाग गायब नसल्याने शिकारीची शक्यता नाकारली आहे. वनविभागाच्या माहितीनुसार, बिबट्याच्या शवविच्छेदन अहवालात बिबट्याचा मृत्यू हा श्वास घेण्यास त्रास आणि रक्तस्त्राव झाल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गोरेगाव फिल्मसिटीमध्ये एक नर बिबट्या मृतावस्थेत असल्याचा फोन वन नियंत्रण कक्षाला आला होता, यानंतर वनविभागाच्या बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. प्राथमिक तपासात बिबट्याचे सर्व अवयव सुरक्षित असल्याचे समोर आले असून त्यामुळे शिकारीची कोणतीही शक्यता नसल्याचे सांगितले आहे. अनेक बिबट्यांचे निवासस्थान असलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान घटनास्थळापासून जवळच आहे. ज्याठिकाणी अनेक बिबटे राहतात.

- Advertisement -

रेसिंक असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअरचे (RAWW) संस्थापक आणि राज्य वन विभागाचे मानद वन्यजीव वॉर्डन पवन शर्मा म्हणाले की, मृत्यूचे कारण शोधण्यासाठी बिबट्याचे शव शवविच्छेदनासाठी एसजीएनपीकडे पाठविण्यात आले आहे. नेक्रोप्सी अहवालात मृत्यूचे प्राथमिक कारण श्वासोच्छवासातील अडथळा डोक्याला दुखापत झाल्याने होत असलेला रक्तस्त्राव असल्याचे समोर आले आहे.


पुण्यात अपघातांची मालिका थांबेना! शिवशाही बस आणि कंटेनरच्या धडकेत 1 ठार, 6 जखमी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -