घरCORONA UPDATEसहायक आयुक्तांना काम करू द्या; विरोधी पक्षनेत्यांची नाराजी

सहायक आयुक्तांना काम करू द्या; विरोधी पक्षनेत्यांची नाराजी

Subscribe

आयुक्तांनी केवळ पाच मिनिटांमध्ये ‘व्हीडीओ कॉन्फरन्सिग’द्वारे मार्गदर्शन करून त्यांना विभागात काम करण्यास मोकळीक द्यावी, अशी आग्रही सूचना विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुंबईत ‘कोरोना कोविड १९’चा संसर्ग झपाट्याने पसरून रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी हे ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’ तसेच ‘झुम कॉल’द्वारे सर्व विभागाच्या सहायक आयुक्तांना एका जागी खिळवून ठेवत, त्यांना प्रत्यक्षात काम करू देत नाही. परिणामी रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आयुक्तांनी केवळ पाच मिनिटांमध्ये ‘व्हीडीओ कॉन्फरन्सिग’द्वारे मार्गदर्शन करून त्यांना विभागात काम करण्यास मोकळीक द्यावी, अशी आग्रही सूचना विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे तसेच टि्वटरद्वारे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत असलेल्या रुग्ण संख्येचे दाखले देत महापालिकेच्या कारभारात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. मुंबईमध्ये ‘कोरोना कोविड – १९’च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’नंतर बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज कोरोना विरोधातील लढा आता तीव्र झाला आहे. ही लढाई आता प्रत्यक्ष मैदानावर जावून लढण्याची वेळ असताना मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी आपल्या २४ विभागांच्या सहायक आयुक्तांसह खातेप्रमुख, तसेच डॉक्टर्स यांना ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’ व ‘झुम कॉल’द्वारे ४ ते ६ तास एकाच जागी खिळवून ठेवत आहे. त्यामुळे विभागातील वाढती रुग्ण संख्या रोखण्यात विभागाचे सहायक आयुक्त कमी पडताना दिसत आहे. परिणामी ही संख्या अधिकच वाढत जात आहे. त्यामुळे आयुक्तांना निर्देश देवून सहायक आयुक्तांना व्हिडीओ कॉल व झुम कॉलवर जखडून न ठेवता विभागात जास्तीत जास्त लक्ष देण्यास भाग पाडण्यास भाग पाडावे, असे यात म्हटले आहे.

- Advertisement -

‘कोरोना’चा सामना करण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉयसह पॅरामेडिक स्टाफ तसेच सर्व महापालिकेचे विभागीय सहायक आयुक्त आणि त्यांचा कर्मचारीवृंद, सफाई कामगार, आरोग्य विभागाचे इतर कामगार तसेच अत्यावश्यक सेवेतील सर्व कामगार, कर्मचारी आपले कर्तव्य चोख निभावत आहे. ते योग्य प्रकारे काम करत असून जर विभागाच्या सहायक आयुक्तांना व्हिडीओ कॉन्फरन्स किंवा झुम कॉलच्या नावाखाली जर आयुक्त सहायक आयुक्तांचा वेळ वाया घालवत आहेत. त्यापेक्षा महापालिका आयुक्तांनी सर्व सहायक आयुक्तांना ‘एसओपी’ ठरवून देत त्याप्रमाणे काम करून घेतल्यास यावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल, असेही त्यांनी यात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -