घरCORONA UPDATELockdown- विद्यार्थ्यांनो आता घर बसल्या द्या परीक्षा!

Lockdown- विद्यार्थ्यांनो आता घर बसल्या द्या परीक्षा!

Subscribe

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची समितीकडे मागणी

लोकडाऊन वाढल्याने कॉलेजमधील परीक्षा घेण्याबाबत नेमलेल्या समितीसमोर राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुनी प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याना प्रश्नपत्रिका घरी द्याव्यात तर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा नेहमीप्रमाणे घ्याव्यात अशी मागणी केली आहे. मात्र, ही परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन, घ्याव्या याचा निर्णय राज्यपालांवर सोपविण्यात आला आहे.

राज्यातील १३ अकृषिक विद्यापीठांअंतर्गत साडेपाच हजार कॉलेज येत असून त्याअंतर्गत सुमारे ५० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे कॉलेज बंद झाल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा रखडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीची नुकतीच राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना घरबसल्या परीक्षा देण्याचा विचार मांडण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना १५ दिवसांची मुदत देऊन त्यांच्याकडून सर्व विषयांच्या प्रश्‍नपत्रिका सोडवून त्या उत्तरपत्रिका कॉलेजमधील संबंधित विषयांच्या प्राध्यापकांना ई-मेल अथवा व्हॉटसअपवर पाठवून त्याचे मूल्यमापन करता येईल. मात्र, विद्यार्थी पुस्तकांमध्ये पाहून उत्तरे लिहू शकतात. त्यामुळे त्यांच्या गुणांचे मूल्यमापन करताना मागील सेमिस्टरच्या गुणांचा विचार करावा, असेही कुलगुरुंनी समितीकडे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

तर तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची परीक्षा असल्याने त्यांची परीक्षा नेहमीप्रमाणे घेतली जावी अशी सूचना कुलगुरूंनी समितीसमोर केली आहे.


हे ही वाचा – खुशखबर! हेल्थ इन्शुरन्स भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -