घरमुंबईस्मार्ट लुकसाठी...होऊ द्या खर्च!

स्मार्ट लुकसाठी…होऊ द्या खर्च!

Subscribe

केशकर्तन, दाढी,कलप, फेशियलच्या दरात २० टक्क्यांनी झाली वाढ

बदलत्या लाईफस्टाईलनुसार मेकअप हा आता महिलांचा नव्हे तर पुरुषांचाही दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक झाला आहे. परंतु, नव्या वर्षात सलून असोसिएशनने सुमारे २० टक्के दरवाढ केली आहे. त्यामुळे स्मार्ट दिसण्यासाठी आता पुरुषांना अधिक खर्च करावा लागणार आहे.

बदलापुरात सलून असोसिएशनने १ जानेवारीपासून नवीन दर लागू केले आहेत. पूर्वीपेक्षा हे दर सुमारे २० टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. त्यानुसार ग्राहकांना आता केस कापण्यासाठी ६० रुपये, स्टायलिश हेअर कटसाठी ७० रुपये मोजावे लागणार आहेत. मुलांच्या बेबी कटसाठी कोणतीही दरवाढ न करता पूर्वीप्रमाणे ५० रुपयेच ठेवण्यात आले आहेत. पाच वर्षांखालील मुलांचे केस कापण्यासाठी पूर्वी ४० रुपये आकारण्यात येत होते. आता त्यामध्ये १० रुपयांची वाढ करून ते ५० रुपये करण्यात आले आहेत. पूर्वी ३० रुपयात केल्या जाणार्‍या साध्या दाढीसाठी आता ४० रुपये मोजावे लागणार आहेत. तर स्पेशल दाढीच्या आणि फोम दाढीच्या दरात १० रुपयांची वाढ करून आता अनुक्रमे ५० ते ६० रुपये करण्यात आले आहेत.

- Advertisement -

मशीन हेड मसाज ६० वरून ७० रुपये करण्यात आले आहेत. तर मशीन फेस मसाज १०० वरून १२० रुपये करण्यात आले आहेत. फेस स्क्रब मसाजमध्ये ३० रुपयांची वाढ करून १५० रुपये करण्यात आले आहेत. काळी मेहंदी १०० वरून १२० रुपये करण्यात आली आहे. हेअर कलर आणि हेअर हायलाईटच्या दरात कोणतीही वाढ न करता ते पूर्वीप्रमाणे अनुक्रमे २०० ते २५० रुपये ठेवण्यात आले आहेत. जावळ, मुंज, लग्नाची दाढी आणि क्षौर यांच्या दरातही कोणतीही वाढ न करता त्यासाठी पूर्वीचाच ५०१ रुपये दर कायम ठेवण्यात आला आहे. ब्लिचच्या दरात ५० रुपयांची तर फेशियलच्या दरात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली असून त्यासाठी आता अनुक्रमे ३५० रुपये ते ५०० रुपये मोजावे लागणार आहेत.

सेवा              जुने दर     नवीन दर
केस कापणे       ५० रु        ६० रु
स्टायलिश केस    ६० रु        ७० रु
साधी दाढी         ३० रु        ४० रु
स्पेशल दाढी       ४० रु        ५० रु
फोम दाढी         ५० रु         ६० रु
मशीन फेस मसाज १०० रु        १२० रु
फेस स्क्रब मसाज   १२० रु       १५० रु
काळी मेहंदी         १०० रु       १२० रु
ब्लिच                 ३०० रु       ३५० रु
फेशियल             ४०० रु       ५०० रु

- Advertisement -

दुकानभाडे, वीज तसेच सौंदर्य प्रसाधनांच्या, इतर साहित्यांच्या किमतीत तसेच मजुरीत वाढ झाल्याने केशकर्तन आणि इतर सेवांच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जानेवारी २०१९ पासून नवे दर लागू झाले आहेत.
– रवींद्र जाधव, अध्यक्ष, वीरभाई कोतवाल नाभिक समाज, सलून असोसिएशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -