Tuesday, April 13, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई शपथविधी दरम्यान आवाजाची पातळी नव्वदी पार!

शपथविधी दरम्यान आवाजाची पातळी नव्वदी पार!

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दादरच्या शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळेस, आवाज फाउंडेशन या आवाजाच्या पातळी मोजणाऱ्या संस्थेने शिवाजी पार्कवरील आवाजाची तपासणी करत नोंद केली. यात सर्वात जास्त शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या आवाजाची नोंद करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या आवाजाच्या पातळीने नव्वदी डेसिबल पार केली.


आवाज फाउंडेशनकडून शिवाजी पार्कवर केल्या गेलेल्या सर्व्हेनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाजाची ८४.९ डेसिबल एवढी पातळी नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल एकनाथ शिंदे यांच्या ९३.९ डेसिबल एवढ्या आवाजाची पातळी नोंद केली गेली. सुभाष देसाई ७३.२ डेसिबल, जयंत पाटील ७८.२, छगन भुजबळ ८०.२, बाळासाहेब थोरात ९०.२ आणि काँग्रेसच्या नितीन राऊत यांच्या ८०.७ डेसिबल एवढ्या आवाजाची पातळी नोंद करण्यात आली आहे. या सर्व्हेक्षणात सर्वात जास्त ही एकनाथ शिंदे यांच्या आवाजाच्या पातळीची नोंद करण्यात आली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार म्हणून मोठ्या प्रमाणात शिवाजी पार्कवर दाखल झाले होते. शिवसेनाभवनाच्या बाहेरही मोठ्या प्रमाणात आतिषबाजी, फटाके फोडण्यात आले. पण, शिवाजी पार्कवर शपथविधीच्या सोहळ्यात मंत्र्यांनी घेतलेल्या शपथविधीचाच फक्त आवाजाची नोंद करण्यात आली आहे. त्यात सर्वात जास्त एकनाथ शिंदे यांच्या आवाजाची पातळी जास्त असल्याचं नोंद करण्यात आलं आहे.

- Advertisement -

#Live: मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की… | अब की बार, ठाकरे सरकार

#Live: मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की… | अब की बार, ठाकरे सरकार

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ನವೆಂಬರ್ 28, 2019

उच्च न्यायालयाचा आदेश –
निवासी परिसरात कुठल्याही प्रकारचा ५५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज असता कामा नये. तर, जागतिक आरोग्य संघटनेनुसार, मानवी शरीर हे कुठल्याही अवस्थेत किमान ७० डेसिबल एवढा आवाज सहन करु शकते. पण, सर्व फटाके या पातळीचे उल्लंघन करतात. पण, हायकोर्टाने १२५ डेसिबल मर्यादा दिली आहे.

- Advertisement -