घरCORONA UPDATEम्युनिसिपिल बँकच्यावतीने सभासदांसाठी २५ लाखांचा आयुर्विमा

म्युनिसिपिल बँकच्यावतीने सभासदांसाठी २५ लाखांचा आयुर्विमा

Subscribe

भाजपने म्युनिसिपल बँकेच्या माध्यमातून सभासद असलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा २५ लाख रुपयांचा आयुर्विमा काढण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.

मुंबई महापालिकेच्या कामगार, कर्मचाऱ्यांचा २५ लाख रुपयांचा आयुर्विमा काढण्याची मागणी कामगार संघटनांकडून होत असतानाच आता भाजपने म्युनिसिपल बँकेच्या माध्यमातून सभासद असलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा २५ लाख रुपयांचा आयुर्विमा काढण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली. महापालिकेचे कर्मचारी म्युनिसिपल बँकेचे कर्मचारी असून बँकेतर्फे मृत सभासदांच्या वारसांना २५ हजार एवढी आर्थिक मदत केली जाते. परंतु या युध्दात आतापर्यंत अनेकांनी प्राणाची आहुती दिली असून ही रक्कम तुटपंजी असल्याने बँकच्यावतीने सभासद कर्मचाऱ्यांचा २५ लाख रुपयांचा आयुर्विमा काढण्यात, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

सध्या जगभर कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या महामारीशी देत असलेल्या लढ्यामध्ये अधिकारी, कर्मचारी व कामगारवर्ग अग्रणी असून सर्व जिकीरीने लढा देत आहेत. परंतु दुर्देवाने काहींना या रोगाची लागण होवून त्यांचे मृत्यूही झाले आहेत. आतापर्यंत महापालिकेच्या चार कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे या परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांची मोठी हानी होते. आपल्या मुंबई म्युनिसिपल को-ऑप बँक लिमिटेडचे सभासद हे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व कामगारवर्ग आहेत. हेच सभासद आपला जीव जोखीममध्ये घालून संपूर्ण मुंबईकरांचे आरोग्य अबाधित राहावे आणि त्यांनी रोगमुक्त व्हावे, यासाठी नेहमीच झटत आहेत. महापालिकेच्या मृत कामगार, कर्मचारी व अधिकारी वर्गाच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह सुरु राहावा व त्यांना दिलासा म्हणून बँकेच्या सभासदाच्या वारसांना २५ हजार रुपये आर्थिक मदत मंजूर करण्यात आल्याचे कळते. परंतु ही रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याचे प्रभाकर शिंदे यांनी आयुक्तांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

त्यामुळे सर्व सभासदांचा बँकेमार्फत २५ लाख रुपयांचा आयुर्विमा काढण्यात यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. मुंबईकरांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सोयी सुविधांसाठी सदैव तत्पर असलेल्या कामगार, कर्मचारी, अधिकारी यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह सुरु राहून त्यांना दिलासा मिळेल. तसेच आयुर्विम्यासंबंधात येणारा खर्च हा सभासदांना देण्यात येणाऱ्या लाभांशाच्या रकमेतून वळता करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -