राणे कुटूंब माझ्या वाईटावर उठलयं, म्हणूनच मला सुरक्षा – वरूण सरदेसाई

राणे कुटूंबीयांवर बदनामीचा दावा कोर्टात दाखल करणार असल्याचा वरूण सरदेसाईंचा खुलासा

varun-sardesai
राणे कुटूंब माझ्या वाईटावर वरूण सरदेसाई यांचा इशारा , म्हणूनच मला सुरक्षा - वरूण सरदेसाई

राणे यांच संपुर्ण कुटूंब वाईटावर उठलय म्हणूनच मला सुरक्षा दिली आहे. गेल्या सहा महिन्यात राणे कुटूंबाकडून बेछूटपणे आरोप करण्यात आले आहेत. राणे कुटूंबीयांकडून धोका असल्यानेच मला पुरवण्यात आलेली सुरक्षा ही त्याचाच भाग असल्याचे युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी स्पष्ट केले. शिवालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मला वाय प्लस सुरक्षा नाही, एक्स कॅटेगरीची सुरक्षा असल्याचाही खुलासा त्यांनी यावेळी केला. सुरक्षेचा भाग म्हणून माझ्यासोबत एकमेव पोलिस कॉन्स्टेबल सोबत असतात. राणे कुटूंबीयांची सहा महिन्यातील विविध पत्रकार परिषदांमध्ये त्यांचे भाषण बोलायची पद्धत पाहिली तर राणे कुटूंबीयांकडून धोका असल्याचाही त्यांनी उच्चार केला. आमदार नितेश राणे यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत केलेले बेछूट आरोप पाहता हे आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांची आहे. आरोप करण्याच्या प्रकारावरच राणे कुटूंबीयांवर बदनामीचा दावा कोर्टात दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

युवा सेनेची सचिव वरूण सरदेसाई यांनी आमदार नितेश राणे यांनी केलेल बेछूट आरोपांवर बदनामीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. संपुर्ण राणे कुटूंबीयांना बेछूट आरोप करायची सवय आहे. आज करण्यात आलेले आरोप हे बेछूट आणि तथ्यहीन आहेत. म्हणूनच या प्रकरणात आरोप सिद्ध करावेत किंवा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे असे आव्हान वरूण सरदेसाई यांनी दिले. राणे कुटूंबीयांनी ते कॉंग्रेसमध्ये असताना त्यांनी भाजपवर आरोप केले, भाजपमध्ये गेल्यावर महाविकास आघाडीवर आरोप करण्यास त्यांनी सुरूवात केली आहे. माझ्यावरही वैयक्तिक आरोप करण्यात आले. या राणे कुटूंबीयांना महाराष्ट्रातील जनता भीक घालत नाही. तसेच जनता गांभीर्याने घेत नाही हे दिसते. म्हणूनच आरोप सिद्ध करण्याचे आव्हान त्यांनी राणे कुटूंबीयांना दिले आहेत.

मी सुसंस्कृत कुटूंबातून येतो, राजकारणाची आवड म्हणून युवासेनेच काम करतो. आरोप केलेली कोणतीही काम करायला इच्छा नाही, माझ्याकडून ते घडणारही नाही असे सरदेसाई म्हणाले. ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत, त्या राणे कुटूंबाची पार्श्वभूमी सर्वश्रृत आहे. राणे कुटूंबीयांची सुरूवातीची गॅंग असो, असंख्य सिरीयस गुन्हे या कुटूंबीयांवर आहेत. त्यामध्ये खूनापासून ते खंडणी, धमकावणे आणि किडनॅप करणे अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणे कुटूंबीयांचा रेकॉर्ड हा विधानसभेत मांडला आहे, तो रेकॉर्डवर आहे. आज भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जे बेछूट आरोप केले. हे आरोप तथ्यहीन आहेत. आमदार नितेश राणे यांच्यावर बदनामीचा दावा दाखल करणार आहे. त्यामुळे राणे कुटूंबीयाने आरोप सिद्ध करावे अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला समोर जावे असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

आयपीएल बेटींग, सचिन वाझे यांच्यासोबतचा सीडीआर हे सगळे आरोप सरदेसाई यांनी फेटाळून लावले. माझे पॉलिटीकल करियर डॅमेज करण्याचा प्रयत्न आहे. यापुढच्या काळात हे करियर डॅमेज होऊ नये म्हणूनच बदनामीचा खटला दाखल केला आहे. राणे यांची प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेत नाही. पण आरोप चुकीचे आणि वेदना देणारे असे आहेत. त्यामुळेच राजकीय करियरला त्रास होतो. पश्चिम उपनगरातील नेत्याचे नाव सांगावे अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली. या प्रकरणातील पुरावे तपास यंत्रणेला द्यावेत. चौकशीला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत असेही परब म्हणाले.