घरमुंबईSharad Pawar : '...म्हणून आजवर रायगडावर यायला वेळ मिळाला नाही'; भाजपचा पवारांवर...

Sharad Pawar : ‘…म्हणून आजवर रायगडावर यायला वेळ मिळाला नाही’; भाजपचा पवारांवर हल्लाबोल

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या तुतारी या चिन्हाचं शनिवारी किल्ले रायगडावर अनावरण करण्यात आले. यावरून महाराष्ट्र भाजपाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. दुसऱ्यांचे घर फोडण्यात आजपर्यंत त्यांचे आयुष्य गेले, त्यामुळे रायगडावर यायला त्यांना आजपर्यंत वेळ नव्हता, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र भाजपाने ट्वीटद्वारे शरद पवार यांच्यावर केली आहे.

हेही वाचा – Amol Mitkari : अट एकच…आवाज तुतारीतूनच यायला हवा; आव्हान तर दिलं, पण चेक लिहिताना मिटकरी गंडले

- Advertisement -

ट्वीटमध्ये काय ?

आता निवडणुका जवळ आल्याने आणि बहुतांश सहकारी अजितदादांसोबत गेल्याने श्री. शरद पवार यांना रायगडाची आठवण आली आहे. सहानुभूती निर्माण करून मते मिळवण्याकरता या वयात शरद पवार यांना असे उद्योग करावे लागत आहेत. ४० वर्षांत शरद पवार यांना कधीही रायगडाची आठवण झाली नाही. कधीही दुर्ग संवर्धनासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले नाहीत. आजपर्यंत त्यांचे आयुष्य दुसऱ्यांचे घर फोडण्यात गेले आहे. त्यामुळे आजपर्यंत शरद पवारांना रायगडावर यायला वेळ नव्हता.
अशा शब्दात भाजपने पवारांना टोला लगावला आहे.

- Advertisement -

४० वर्षांनी घडलेल्या गोष्टीचा आनंद

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांना टोला लगावला आहे. किल्ले रायगडावर आज तुतारी वाजली, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले की, ४० वर्षांनंतर शरद पवार हे रायगडावर गेले, या एकाच गोष्टीचा मला आनंद आहे. या गोष्टीचे क्रेडिट तर अजित पवार यांना द्यावेच लागेल. त्यांच्यामुळे ४० वर्षांनंतर शरद पवार यांना रायगडावर जावे लागले. त्यामुळे आता तुतारी कशी वाजते? कधी वाजते? कुठे वाजते? किती वाजते? हे भविष्यात कळेल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला आहे.

हेही वाचा – Hyderabad Crime : ऐकावं ते नवलच! लग्नास नकार दिला म्हणून ‘तिने’ केले टीव्ही Anchor अपहरण

रायगडावर चिन्हाचा अनावरण सोहळा संपन्न

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच तुतारी वाजवणारा माणूस हे नवं पक्षचिन्ह दिले आहे. या चिन्हाचे अनावरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर करण्यात आले. यावेळी शरद पवार यांनी महाराजांच्या कालखंडाचा उल्लेख करत आपल्या कार्यकर्त्यांना लढण्याचे आवाहन केले आहे. “आज महाराष्ट्राची जी स्थिती आहे ती बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी कष्ट करावे लागण्याचा हा कालखंड आहे. त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या नावाने ही संघटना आपण सर्वांनी उभी केली असून ती मजबूत करायची आहे,” असे आवाहन शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -