Eco friendly bappa Competition
घर मुंबई Live Update : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती, भाई...

Live Update : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती, भाई जगतापांना हटवलं

Subscribe

9/6/2023 17:38:29 मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती

काँग्रेस पक्षाकडून मुंबईत मोठे बदल

- Advertisement -

भाई जगताप यांची केली उचबांगडी


9/6/2023 17:17:51 संजय राऊत धमकी प्रकरणी दोघजण ताब्यात


- Advertisement -

9/6/2023 16:24:45 पवारांना धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

एल.टी.मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


9/6/2023 15:49:14 डबेवाल्यांना घरं मिळणार, आमदार श्रीकांत भारतीय यांची माहिती


9/6/2023 15:47:58 धमकीची मी चिंता करत नाही – शरद पवार


9/6/2023 14:28:14 राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे निर्देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली माहिती

गरज असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिले आहेत


9/6/2023 14:24:18 राज्यात धार्मिक उन्माद निर्माण करण्याचा डाव – संजय राऊत

दंगली आणि धमक्यांमागे अदृश्य शक्ती असल्याचा संजय राऊतांचा आरोप

दंगली घडवणाऱ्यांना पडद्यामागून प्रोत्साहन दिले जाते – राऊत

दंगलीआडून महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेण्याचा कट


9/6/2023 14:3:26 धमकी देणाऱ्यास तात्काळ अटक करा – जयंत पाटील


9/6/2023 13:44:36 राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रोहित पवार आक्रमक

पवारांना धमकी येणे म्हणजे विशिष्ट घटकांवर सरकारची जरब नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे

सरकारला थोडं जरी जबाबदारीचं भान असेल तर या प्रकरणी थातूरमातूर कारवाई करू नये

धमकी देणाऱ्यांच्या आणि त्यामागील मास्टरमाईंडच्या तातडीने मुसक्या आवळाव्यात असे रोहित पवार म्हणाले


9/6/2023 13:8:30 राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना धमकीप्रकरणी गृहमंत्र्यांचे कारवाई करण्याचे आदेश

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले आदेश 

शरद पवार यांना धमकी देणाऱ्या ट्विटर अकाऊंटची चौकशी करुन कारवाई करण्याचे दिले आदेश


9/6/2023 13:8:30 शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे धमकीप्रकदरणी गृहमंत्र्यांना पत्र

संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना एका निनावी व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे

सुनील राऊत यांच्या फोनवरून ही धमकी आली होती


9/6/2023 12:15:40 धर्मांतर प्रकरणी मुंब्र्यात राहणार शाहनवाज खान सध्या फरार

शाहनवाज खान धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी

पोलिसांनी गोठवलं शाहनवाज खानचे बँक अकाऊंट


9/6/2023 11:36:21 मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर मेघदुत बंगल्यावर दाखल


9/6/2023 11:26:46 निलेश राणेंच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन

पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात


9/6/2023 10:36:59 राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांपोठापाठ संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

संजय राऊत यांच्यासह सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी

सुनील राऊत यांना धमकीचा आला फोन


9/6/2023 10:34:13 राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

‘तुमचा दाभोलकर होणार’ म्हणत दिली धमकी

सुप्रिय सुळे मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला

धमकीनंतर शरद पवारांच्या पुण्यातील घराबाहेरील सुरक्षेत वाढ


9/6/2023 10:28:52 अमित शाह उद्या नांदेड दौऱ्यावर

मोदी सरकारची कामगिरी सांगण्यासाठी महत्त्वाकांक्षी कार्यक्रम

भाजपने लोकसभा, विधानसभेसाठी कंबर कसली

राज्यात 30 जूनपर्यंत 51 मोठ्या सभा घेणार

राज्यात 4 हजार छोट्या सभा घेणार

भाजपाचं महाराष्ट्रात महासंपर्क अभियान राबवणार


9/6/2023 10:9:20 प्रत्येक दंगलीमागे राजकीय हात संजय राऊतांचा गंभीर आरोप

हिंदू-मुस्लिमांमध्ये दुही माजवठण्याचा प्रयत्न होत असतो – संजय राऊत


9/6/2023 10:5:47 कॉर्डिलिया क्रूजवर त्या दिवशी न्यायदंडाधिकारी होता

आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकरांचा गंभीर आरोप


9/6/2023 9:32:58 एकनाथ शिंदे पुन्हा महिना अखेरीस अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता

काष्ठ समर्पण समारोहासाठी राज्याचे नेते आयोध्यात जाणार

राम कथा पार्क या ठिकाणी हा कार्यक्रम होणार

भाजपचे जवळपास 300 नेते पदाधिकारी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची शक्यता


9/6/2023 7:49:44 औरंगाबाद नगर महामार्गावर भीषण अपघात

भरधाव कंटेनरची टेम्पोला धडक

धडकेत टेम्पोमधील सहा जण जखमी

जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले


9/6/2023 7:18:3 मुंबईतील झवेरी बाजारमधील पाच मजली इमारतीला भीषण आग

इमारतीत अडकलेल्या 50 ते 60 लोकांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला

अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू


9/6/2023 7:18:3 महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेची कार्यकारिणी आज होणार जाहीर

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात येणार

आज सकाळी 10 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मध्यवर्ती कार्यालय राजगड, शिवाजीपार्क, दादर येथे हा सोहळा पार पडणार

यावेळी मनसेचे असंख्य पदाधिकारी आणि चित्रपट सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार

- Advertisment -