घरमुंबईपरतीच्या पावसामुळे एक दिवसापुरते भारनियमन रद्द

परतीच्या पावसामुळे एक दिवसापुरते भारनियमन रद्द

Subscribe

उकाडा घटल्यामुळे विजेची मागणी रोडावली

मुंबई:-राज्यात वाढलेल्या उकाड्यामुळे गेल्या काही दिवसांपासून होणार्‍या सततच्या भारनियमनाला आजच्या दिवसासाठी ब्रेक लागला. राज्यातील परतीच्या पावसाच्या हजेरीचा परिणाम हा विजेची मागणी कमी होण्यावर झाला. तसेच आजच्या सार्वजनिक सुटीमुळेही अनेक आस्थापनांना असणार्‍या सुटीचा परिणाम म्हणूनही विजेच्या मागणीतील घट होण्यावर झाला. राज्यातील विजेच्या मागणीच्या तुलनेत आज पहिल्यांदाच महावितरणला वीज उपलब्ध करून देणे शक्य झाले. महावितरणची आजची विजेची मागणी १८९५४ मेगावॉट होती. महावितरणने आजही ३५०० मेगावॉट वीज खुल्या बाजारातून विकत घेतली.

महावितरणने खरेदी केलेल्या विजेमध्ये तीन हजार मेगावॉट वीज ही ओपन एक्सचेंजमधून तर ५०० मेगावॉट वीज ही करारान्वये खरेदी करण्यात आली. आजचे भारनियमन रद्द करतानाही महावितरणची दमछाक झाली. महावितरण सातत्याने ८ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत भारनियमन केले आहे. महावितरणला वीज पुरवणार्‍या महानिर्मिती कंपनीला तसेच खासगी वीज प्रकल्पांना भेडसावणारी कोळशाची चणचण ही मुख्यत्वेकरून विजेच्या निर्मितीवर परिणाम करणारी आहे. कृषीपंपाची वाढलेली विजेची मागणी तसेच कोयना जलविद्युत प्रकल्पातील पाणी वापरावर आलेल्या मर्यादा यामुळेच महावितरणला भारनियमन करण्याशिवाय पर्याय उरला नाही.

- Advertisement -

जी १ ते जी ३ या ग्राहक श्रेणीअंतर्गत भारनियमन करण्याची वेळ महावितरणवर आली. राज्यात आज सुटीचा दिवस असल्याचा परिणाम हा विजेची मागणी कमी करण्यावर झाला. तसेच परतीच्या पावसाचा परिणामही वातावरणातील उकाडा कमी करण्यावर झाला. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातही पाऊस होता. त्यामुळे विजेच्या मागणीने २० हजार मेगावॅटचा आकडा ऑक्टोबरमध्ये पार केला नाही. पण यंदा सप्टेंबर महिन्यातच विजेच्या मागणीने २० हजार मेगावटचा आकडा गाठला.

१६ ऑक्टोबरला सर्वाधिक वीज मागणी

विजेच्या मागणीतील आतापर्यंतचा उच्चांक १६ ऑक्टोबर रोजी नोंदवण्यात आला. त्यावेळी राज्यात सर्वाधिक विजेची मागणी दुपारी १२ वाजता २४९२२ मेगावॅट इतकी नोंदविण्यात आली. महावितरणच्या विजेच्या ग्राहकांची मागणी २१५४२ मेगावॅट होती. कोणत्याही तांत्रिक बिघाडाशिवाय ही विजेची मागणी पूर्ण करण्यात महावितरण आणि महापारेषणला यश आले. १७ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता विजेची मागणी २४६८७ मेगावट होती. त्यामध्ये महावितरणची विजेची मागणी २१२२३ मेगावट तर उर्वरीत मुंबईची विजेची मागणी होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -