घरताज्या घडामोडीमुंबईकरांनो आज नाइट लाइफ बंद!

मुंबईकरांनो आज नाइट लाइफ बंद!

Subscribe

शनिवारी ८ फेब्रुवारीच्या रात्री १०.१५ ते रविवारी सकाळी सव्वासहा वाजेपर्यंत जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. चर्नी रोड ते ग्रॅण्ट रोड दरम्यान असलेल्या फेररे उड्डाणपुलावरील गर्डरच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान लोकल फेऱ्या रद्द होणार नाहीत. मुंबई सेंट्रलपर्यंतच अप दिशेने येणाऱ्या लोकल धावणार असून याच स्थानकातून विरारच्या दिशेने गाड्या सोडण्यात येणार आहेत. अशाप्रकारे १३६ फेऱ्या होणार आहेत. रविवारी सकाळी ११ पासून पाच तासांचा ब्लॉक पश्चिम रेल्वेकडून हार्बर मार्गावर माहीम ते गोरेगाव दरम्यान घेण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेच्या मुख्य मार्गावर लोकल सेवा सुरळीत राहणार आहे. ब्लॉकच्या कामानिमित्ताने मध्य रेल्वेकडून भायखळा ते माटुंगा डाऊन जलद मार्गावरील वेळापत्रक विस्कळीत राहील. याशिवाय हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे या मार्गावरील वेळापत्रक विस्कळीत होणार आहे.

पश्चिम रेल्वे

- Advertisement -

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान सर्व मार्गावरील शनिवार १०.१५ ते रविवारी ६.१५ वाजेपर्यंत लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे बोरिवलीसाठी चर्चगेट स्थानकातून शेवटची धिमी लोकल रात्री ९.५१ वाजता तर रात्री १०.०१ वाजता विरारसाठी शेवटची जलद लोकल सोडण्यात येणार आहे. चर्चगेटसाठी बोरिवलीतून शेवटची अप लोकल रात्री ९.०३ वाजता तर विरारमधून शेवटची जलद लोकल चर्चगेटसाठी रात्री ८.५१ वाजता सुटणार आहे.

पश्चिम रेल्वे हार्बर

- Advertisement -

हार्बरवरील माहीम ते गोरेगाव या दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रविवार सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – नवी मुंबईत इमारतीला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी टळली!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -