घरताज्या घडामोडीMumbai Local Train : मुंबई लोकल फर्स्ट क्लासच्या तिकीट दरात कपात,...

Mumbai Local Train : मुंबई लोकल फर्स्ट क्लासच्या तिकीट दरात कपात, मात्र मासिक पासचा दर जैसे थे

Subscribe

मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लास तिकीट दरात कपात करण्यात आली आहे. यापूर्वी एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. तर आता १ मे पासून फर्स्ट क्लासच्या तिकीट दरात ५० टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे मुंबईतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु मासिक पासच्या दरात कोणतीही कपात करण्यात आली नाही.

रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांसाठी मोठा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मुंबईत गर्दी वाढली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात लोकलने लोक प्रवास करत असतात. लोकलने प्रवास करणाऱ्यांमध्ये मध्यमवर्गीय लोकांची मोठी संख्या आहे. यामधील ज्या लोकांना लोकलच्या फर्स्ट क्लासचे तिकीट परवडत नव्हते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे एसी लोकल पाठोपाठ आता फर्स्ट क्लासच्या दरातही कपात करण्यात आली आहे. यामुळे फर्स्ट क्लासच्या डब्यात प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. परंतु मासिक पासच्या किंमती कमी करण्यात आल्या नाहीत यामुळे काही प्रवाशांची नाराजी आहे.

- Advertisement -

मुंबईतील फर्स्ट क्लासच्या डब्यात मासिक पास काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या फार मोजकी होती. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांची कपात

मुंबईत एसी लोकल सुरु करण्यात आली असून अनेक महिन्यांपासून या लोकला मुंबईकरांचा थंड प्रतिसाद आहे. सध्या गर्मीचे दिवस असून उष्णता वाढली असली तरी लोकांनी एसी लोकलकडे पाठ फिरवली आहे. याचे कारण म्हणजे एसी लोकलचे तिकीट जास्त होते. यामुळे रेल्वे प्रशासनाने तिकीट दरात ५० टक्क्यांची कपात केली आहे. सामान्य नागरिकांनाही एसी लोकलच्या तिकीटाचे दर परवडतील असे तिकीट दर ठेवण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : बाळासाहेब भोळे होते पण मी ‘धूर्त’ फसणार नाही, मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -