घरमुंबईसीएसएमटी स्थानकावर लोकल बफरला धडकली

सीएसएमटी स्थानकावर लोकल बफरला धडकली

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर लोकलचे ब्रेक बफरला धडकले. परंतु, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. मोटरमनने तत्काळ आपत्कालीन ब्रेक कार्यान्वित केले आणि परिस्थिती नियंत्रणात आली. या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही.

- Advertisement -

काय आहे नेमके प्रकरण?

शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धीमी लोकल ट्रेन सीएसएमटी रेल्वे स्थानकातील फ्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आली. लोकल फ्लॅटफॉर्मवर दाखल झाल्यानंतर प्रवासी उतरले. मात्र काहीच सेकंदाच्या अंतराने लोकल बफरवर आदळली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, रेल्वे सुरक्षा बलासह, रेल्वे पोलीस घटना स्थळी पोहचले. यानंतर फ्लॅटफॉर्म ३ वरून सर्व वाहतूक बंद करण्यात आली. दरम्यान बफरवर आदळलेली लोकल कुर्ला कारशेडमध्ये पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणी मध्य रेल्वेने चौकशीचे आदेश दिले आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -