घरठाणेLocal Train : फटका गँगच्या चोरीची पद्धत बेतली युवकाच्या जीवावर; खांद्यापासून हात...

Local Train : फटका गँगच्या चोरीची पद्धत बेतली युवकाच्या जीवावर; खांद्यापासून हात गमावला

Subscribe

ठाण्यामध्ये पुन्हा एकदा फटका गँगचं प्रकरण समोर आलं आहे. या फटका गँगमुळे शशिकांत कुमार या 22 वर्षीय तरुणाला कायमचं अपंगत्व आलं आहे.

मुंबई : मुंबईची जीवनवाहीनी म्हणून ओळख असलेल्या लोकल ट्रेनचा प्रवास जेवढा सुखकर आहे तेवढाच तो काही गुन्हेगारांमुळे जीवघेणा ठरत असल्याचे चित्र आहे. लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका तरुणाकडील मोबाइल चोरणाऱ्या फटका गॅंगने मोबाइलवर हातमारण्याच प्रयत्न केला. त्यामध्ये युवकाचा खांद्यापासून हातच गमावावा लागला. (Local Train Hita gangs method of theft took the life of Betli youth Lost arm from shoulder)

ठाण्यामध्ये पुन्हा एकदा फटका गँगचं प्रकरण समोर आलं आहे. या फटका गँगमुळे शशिकांत कुमार या 22 वर्षीय तरुणाला कायमचं अपंगत्व आलं आहे. नवी मुंबईमधील शशिकांत कुमार हा तरुण वांगणी येथून ठाण्याचा दिशेने लोकलच्या गेटमध्ये उभे राहून मोबाइल फोन हातात घेऊन प्रवास करत असताना दिवा फलट क्रमांक दोनवर फटका गँग म्हणजेच मोबाइलवर हातमारणाऱ्या चोरट्यांमुळे शशिकांत कुमारला त्यांचा हात खांद्यापासून गमवावा लागला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तत्परता, छत्रपती संभाजीनगरच्या मुलीचा वाचवला जीव

नेमकं काय घडलं प्रवासादरम्यान? एकदा वाचाच

लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करणाऱ्यांवर फटका गँगची नजर असते. चोरटे लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करणाऱ्यांचा फायदा घेत मोबाइल फोन लंपास करतात. पण, फटका गँगची ही चोरीची पद्धत अनेक प्रवाशांसाठी जीवघेणी ठरते. असाच काहीसा प्रकार दिवा रेल्वे स्थानकातून फलाट क्रमांक दोन वरून रविवारी रात्री 11:56 मिनिटांनी घडला. ठाण्याच्या दिशेने ट्रेन रवाना होताच दिवा रेल्वे स्थानकात एका चोरट्याने शशिकांत कुमार यांच्या मोबाइलवर हात मारला. शशिकांत दारात उभा असल्या कारणाने त्याचा तोल जाऊन शशिकांत कुमार खाली पडला असताना त्यांचा डावा हात रेल्वे आणि रुळाच्या कचाट्यात सापडला. यातच त्याचा खांद्यापासून हात गमवावा लागला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : IND Vs ENG Test: भारत-इंग्लंड कसोटीवर खलिस्तानी अतिरेकी ‘पन्नू’ची नजर; सामना रद्द करण्याची धमकी

एका जणास अटक

या घटनेनंतर रेल्वे पोलिसांच्या साह्याने शशिकांत कुमार याला वैद्यकीय उपचाराकरिता रुग्णालयात हलवले. पोलिसांनी गणेश शिंदे या 29 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. पण या घटनेनंतर अशा घटना वारंवार घडू नयेत म्हणून रेल्वे पोलीस प्रशासन कोणती ठोस पाऊले उचलतील याकडे सर्व प्रवाशांचे लक्ष लागलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -