खारकोपर रेल्वे स्टेशनजवळ लोकलचे तीन डबे रुळावरून घसरले

नेरुळ-उरण प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. खारकोपर रेल्वे स्टेशनजवळ लोकलचे तीन डब्बे रुळावरून घसरले आहेत.

Kharkopar-Train-Slid-Down-1
नेरुळ-उरण प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे.

नेरुळ-उरण प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. खारकोपर रेल्वे स्टेशनजवळ लोकलचे तीन डब्बे रुळावरून घसरले आहेत. ही घटना खारकोपर रेल्वे स्थानकाच्या आधी काही अंतरावर घडली आहे. त्यामुळे नेरूळ-खारकोपर रेल्वे मार्ग वाहतूक ठप्प झाली आहे.

सकाळी साडेआठ वाजताही घटना घडली आहे. बेलापूर रेल्वे स्थानकावरून खारकोपरच्या दिशेने निघालेल्या या लोकलचे डब्बे रुळावरून घसरले आहेत. ही लोकल कमी वेगात धावत होती. त्यामुळे या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतू घसरलेले डब्बे पुन्हा रूळावर आणण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नेरूळ-खारकोपर हा रेल्वे मार्ग तुर्तास बंद ठेवण्यात आलाय.

Kharkopar-Train-Slid-Down-2
. ही लोकल कमी वेगात धावत होती. त्यामुळे या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

यामुळे आता सकाळी उरणच्या दिशेने कामावर निघालेल्या प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झालाय. या घटनेमुळे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर कोणताही परिणाम झालेला नाही. परंतू प्रवासी लोकलमधून उतरून रुळावरून चालत जवळचे रेल्वे स्थानक गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.