घरताज्या घडामोडीलोकल प्रवासांमध्ये पीक अवरची विभागणी होणार, मंत्रालय पॅटर्न राबवण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार

लोकल प्रवासांमध्ये पीक अवरची विभागणी होणार, मंत्रालय पॅटर्न राबवण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार

Subscribe

काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येतील याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या होता. आता हाच मंत्रालय पॅटर्न लोकलच्या वेळत राबवण्याचा दृष्टीकोन मुख्यमंत्र्यांचा असल्याचा दिसत आहे.

आज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘लोकल संदर्भात आमची विनंती आहे की, जसा मी  मंत्रालयात प्रयोग करतोय की वेळा वाटू द्यायचा. ज्यामुळे गर्दी होणार नाही. कारण काम तर सगळ्यांना करावं लागतंय. त्यामुळे आपण ज्याला पीक अवर म्हणतो, त्या पीक अवरची विभागणी करावी. येता-जाताना आणि प्रत्यक्ष कार्यालयाच्या ठिकाणी, कार्यालयात सुद्धा कोविड संदर्भातील सुचनांचा तंतोतंत वापर करावा, अशी सगळ्यांना नम्र विनंती आहे.’

- Advertisement -

सध्या मुंबईचे लोकल प्रवासी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवास करणासाठी दिलेल्या वेळेवर नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच यामुळे अनेक जण विना तिकीट प्रवास करताना देखील दिसले. त्यात जर गर्दी न होण्याच्या दृष्टीकोनातून पीक अवरची विभागणी करावी, असे मत उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केले आहे.


हेही वाचा – वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला, मी तो राजीनामा स्विकारला – मुख्यमंत्री

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -