घरमुंबईलोकल पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली

लोकल पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली

Subscribe

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी मुंबई उपनगरीय लोकल सेवा देण्यास सज्ज झाली आहे. राज्य सरकार, महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये रविवारी लोकल सुरू करण्याबाबत बैठक झाली असून मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला लोकल सेवेचे वेळापत्रक तयार करण्यास सांगण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर १४६ तर मध्य रेल्वेवर २०० लोकल फेर्‍यांचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र रविवारी रात्री उशीरापर्यंत तरी लोकल सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय झालेला नव्हता.

लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना बेस्ट, एसटीच्या बसद्वारे सेवा पुरविली जात आहे. मात्र बसमधून प्रवासासाठी लागणारा वेळ, फिजिकल डिस्टंसिंगचे तीनतेरा, बसमध्ये जाण्यासाठी कर्मचार्‍यांच्या लांबच्या लांब रांगा, यामुळे कर्मचार्‍यांना हा प्रवास नकोसा आणि जीवघेणा वाटू लागला आहे. त्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी लोकल सुरु करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारद्वारे केंद्राला आणि रेल्वे मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. त्यानुसार लोकल सेवा सुरु करण्याची तयारी रेल्वेने केली आहे. त्यानुसार रेल्वेने लोकल फेर्‍या, वेळापत्रक आदी तयारी सुरू केली असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

असा करावे लागण प्रवास
अत्यावश्यक सेवा कर्मचार्‍यांसाठी सुरू करणात येणार्‍या लोकलमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना रेल्वेकडून कोणतेही तिकिट देण्यात येणार नाही. लोकल चालविण्यासाठी राज्य सरकार अत्यावश्यक सेवा कर्मचार्‍यांची यादी रेल्वेला देणार आहे. त्याआधारे तिकिट काढून रेल्वे प्रशासन राज्य सरकारला देईल. या तिकिटांचे पैसे राज्य सरकार रेल्वेला आगाऊ देणार आहे. राज्य सरकार अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना ‘क्यु आर कोड’ आयकार्ड देणार आहे. या लोकल फक्त जलदगती मार्गावर धावणार आहे. तसेच त्या ‘पाईंट टु पाईंट’ चालविण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानक आणि लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकार ऑफीसचा वेळ ठरवेल. कर्मचार्‍यांचे तिकिट,थर्मल तपासणीची जबाबदारी राज्य सरकारची असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -