आरेसाठी मुंबईकरांसह स्थानिकही एकवटले!; काँग्रेसने केली वृक्षाची पूजा

save aarye
आरे वाचवा

मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील जवळपास २ हजार ७०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव नुकताच पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. याविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिकांसह अनेक राजकीय पक्ष एकवटले आहेत. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आज, रविवारी आरे कॉलनीत आला.

रविवारी सकाळपासून पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवत मेट्रो प्रकल्पाविरोधातील घोषणाबाजी केल्या. आरे मेट्रो कारशेडच्या विरोधात पर्यावरण प्रेमींनी रस्त्यावर मानवी साखळी तयार केली. तसेच पर्यावरण प्रेमींनी कारशेड जवळील एका झाडाला रिंगण घालून अनोख्या पद्धतीने आंदोलन करुन निषेध नोंदवला. त्यातच भर म्हणून मुंबई काँग्रेसतर्फेही आरेमध्ये वृक्ष पुजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे मुंबई माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्या हस्ते आरे कारशेड जवळील वृक्षाचे पूजन करण्यात आले. तसेच, शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी आमदार उपस्थित होते.

save aarye
आरे वाचवा

दरम्यान, शिवसेना आरेबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात झाडे कापण्याचे षडयंत्र रचले जात आहे. या प्रस्तावानुसार, २ हजार ७०० झाडं कापली जाणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांसह प्रत्येकाला असं वाटतंय की, आरेतील झाडे कापता कामा नये. कारण, आरे कॉलनीतील वृक्ष म्हणजे मुंबईकरांचा श्वास आहे. त्यामुळे, मुंबई काँग्रेसला जोडून असणारे अनेक पक्ष इथे दाखल झाले आहेत. मेट्रोच्या विरोधात कोणताच पक्ष करत नसेल. पण, झाडं कापून मेट्रो तयार करणे चुकीचे असल्याचे संजय निरुपम यांनी सांगितले.

'आरे मुंबईचा श्वास' काँग्रेसने केले वृक्ष पूजन

'आरे मुंबईचा श्वास' काँग्रेसने केले वृक्ष पूजन

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 15, 2019

शिवसेनेची दुटप्पी भूमिका

शिवसेनेत महानगरपालिकेत सत्तेत असताना त्यांच्यानुसारच हा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आला. एकीकडे कारशेड प्रस्तावित केला जातो आणि त्यानंतर मुंबईकरांच्या रागाला सामोरे जावे लागेल या भितीने वृक्ष कापण्याच्या विरोधात असल्याचे दुसरीकडे सांगतात. त्यामुळे जर शिवसेना वृक्ष तोडीच्या विरोधात असेल तर सरकारमधून हा प्रस्ताव मागे घेण्यात यावा. त्यासोबतच जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा प्रस्ताव रद्द करत नाही, तोपर्यंत येणारी निवडणूक एकत्र लढणार नाही असं जाहीर करावे, असा ही सल्लाही निरुपम यांनी दिला आहे.

हेही वाचा –

विरार-नालासोपारामध्ये ‘चोरी की पोलीस’ बॅनरवरून वाद!