घरCORONA UPDATEलॉकडाऊनमुळे रक्तपेढ्याना भासु शकतो रक्ताचा तुटवडा !

लॉकडाऊनमुळे रक्तपेढ्याना भासु शकतो रक्ताचा तुटवडा !

Subscribe

कोणत्याही रक्तपेढीने थॅलेसेमिया रुग्णाला टाळू नये असे कडक आदेश आहेत असे राज्य रक्त रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले.

मार्चमध्ये लॉकडाऊन केल्यानंतर निर्माण झालेल्या रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी १४ एप्रिलपूर्वी केलेल्या आवाहनाला रक्तदात्यांनी चांगला प्रतिसादही दिला. परंतु लॉकडाऊन वाढल्याने रक्तपेढ्याना पुन्हा रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा‌ रक्तदान शिबिरांची तयारी करावी लागणार आहे.

मार्च अखेरपर्यंत आवाहनाला अनुसरुन राजकीय पक्षांसहीत सामाजिक संस्थांनीही शिबिरांचे आयोजन‌ केले होते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमधील महत्वाच्या शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र थॅलेसेमिया, सिकल सेल, अॅनेमिया, हेमोफेलिया या रुग्णांसह प्रसुती आणि अत्यंत महत्वाच्या शस्त्रक्रियांना रक्ताची सतत निकड असते. या घटकांना कायम रक्त पुरवठा हवा असल्याने रक्त शिबिरे भरवावी लागणार आहेत.

- Advertisement -

यावर बोलताना राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले की, आजच्या दिवशी गरजे एवढा रक्तसाठा आहे. मात्र कोरोनामुळे रक्तदान शिबिरे यावेळी झाली नाहीत. मात्र त्याचवेळी तुलनेने रक्त गरजही कमी झाली आहे. अपघात शून्यावर आले आहेत. शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. कोरोनाचे नियम पाळून संस्थांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. भविष्यात रक्ताची चणचण भासू नये यासाठी नामांकित सामाजिक संस्थांना शिबिरांचे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरेही गरज असेल एवढीच भरण्यात यावीत. रक्त घेवून वाया जाणार नाही याकडे ही लक्ष दिले जात आहे.

कोणत्याही रक्तपेढीने थॅलेसेमिया रुग्णाला टाळू नये असे कडक आदेश आहेत असे राज्य रक्त रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले.

- Advertisement -

हे ही वाचा – अल्पवयीन मुलाने सेक्सला नकार दिला म्हणून तीने त्याच्या ‘प्रायव्हेट पार्ट’ला चटका दिला!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -