घरCORONA UPDATEठाण्यातला लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवला!

ठाण्यातला लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवला!

Subscribe

२ जुलैपासून १२ जुलैपर्यंत ठाण्यामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. २ जुलै रोजी सकाळी ७ वाजेपासून १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत ठाण्यात लॉकडाऊन लागू होता. मात्र, ठाण्यातली वाढती रुग्णसंख्या पाहाता आता ठाण्यातला लॉकडाऊन १२ जुलैपासून १९ जुलैपासून पुन्हा वाढवण्यात आला आहे. १९ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन लागू असेल. ठाणे महानगर पालिका आयुक्त बिपीन शर्मा यांनी हे आदेश काढले आहे. त्यामुळे ठाणेकरांना लॉकडाऊन उठण्यासाठी १९ तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यासोबतच रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत मात्र भर पडली आहे.

thane lockdown

- Advertisement -

या लॉकडाऊन अंतर्गत अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना आणि कोरोना योद्ध्यांना प्रवास आणि बाहेर पडण्याची मुभा असेल. त्यासोबतच घरकाम करणाऱ्या महिला आणि पुरुषांना देखील या लॉकडाऊनमध्ये कामासाठी बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. ठाण्यात सध्याच्या घडीला कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल ५० हजारांच्या घरात गेली असून मृतांचा आकडा १४४५वर पोहोचला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आवर घालण्यासाठी ठाणे महानगर पालिका हद्दीत हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -