घरमुंबईठाण्यात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

ठाण्यात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

Subscribe

भाजीपाला, किराणा खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी

2 जुलै पासून सुरु होणार्‍या लॉकडाऊनसाठी पालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले असून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होण्यासाठी बुधवारी संपूर्ण शहरात पालिका अधिकारी आणि पोलिसांच्या वतीने गस्त घालण्यात आली. विशेष म्हणजे ठाणे मार्केटमध्ये पोलिसांनी गस्त घालत लॉकडाऊनच्या काळात कोणी घराबाहेर पडू नये तसेच नियमांचे कडक पालन करावे असे आवाहन करण्यात आले. गुरुवारपासून लॉकडाऊन सुरु होणार असल्याने तसेच भाजीपाला आणि अन्नधान्यांची दुकाने सुरु राहणार की नाही याबाबत ठाणे महापालिकेने काढलेल्या अध्यादेशात स्पष्टता नसल्याने नागरिकांनी बुधवारी सकाळपासून ठाणे मार्केटसह शहरच्या विविध भागात १० दिवसांसाठी भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी तोबा गर्दी केली होती. त्यामुळे लॉकडाऊनच्या एक दिवस आधीच सोशल डिस्टंन्सिंगचा साफ फज्जा उडाला.

ठाण्यात गुरुवारपासून लॉकडाऊन सुरु होणार असल्याने बुधवारी ठाण्याच्या विविध ठिकाणी अन्नधान्याच्या वस्तू, भाजीपाला खरेदीसाठी लोकांनी जवळपासची दुकाने, मार्टमध्ये गर्दी केली होती. गावदेवी, जांभळी नाका येथील मार्केटमधील अन्य दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. पावसाळी चप्पल, छत्र्या, रेनकोट, ताडपत्रीसाठी वापरला जाणारा प्लास्टिकचा कागद, शालेय साहित्य याचबरोबर कपडे घेण्यासाठीही लोकांची गर्दी दिसली.

- Advertisement -

तब्बल १० दिवस लॉकडाऊन होणार असल्याने वस्तू खरेदीसाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. बुधवारी आषाढी एकादशी असल्याने ठाणेकरांनी उपवासाच्या वस्तू घेण्यासाठी दुकानामध्ये गर्दी झाली होती. ठाण्याच्या अशोक टॉकीजच्या मागील भागात असलेल्या फुल मार्केटमध्ये देखील आषाढी एकादशीमुळे फुले घेण्यासाठी गर्दी उसळलेली पाहायला मिळाली.कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या कळवा विभागात देखील पहाटेच्या मार्केट मध्ये आवश्यक वस्तू घेण्यासाठी कळवेकरांनी पाहटे पासून गर्दी केली होती.महापालिकेच्या पथकाने सकाळी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु दुपारी एक नंतर दुकाने उघडल्याचे दिसून येत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -