जयश्रीने रचला इतिहास, बुकिंगमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी!

जयश्रीच्या कार्याचे एसटी महामंडळाने केलं कौतुक

लॉकडाऊन काळात एकीकडे एसटी महामंडळाचे कर्मचारी दांडी मारत आहे. तर दुसरीकडे एसटीच्या महिला वाहक आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहे. इतकेच नव्हेत तर संकटकाळातही महामंडळातील महिला कर्मचारी उत्कृष्ट कामगिरी करत असल्याचं दिसून येत आहे. नालासोपारा आगारातील गुरुवारी सकाळी १ लाख ९२ हजार रुपयांचे एसटी तिकिटांची स्टँड बुकिंग करण्यात आली होती. ज्यात जयश्री कंचकटले या एकट्या महिला वाहकाने आपल्या ८ तासात ड्युटीत ६१ हजार रुपयांची स्टँड बुकिंग केली आहे. ही बुकिंग एसटी महामंडळाच्या इतिहासातील सर्वाधिक स्टँड बुकिंग आहे. त्यामुळे जयश्रीच्या कार्यामुळे एसटी महामंडळात कौतुकाच्या वर्षाव होत आहे.

कोरोनाच्या संकट काळात एसटी महामंडळाच्या गेल्या अडीच महिन्यापासून चाक थांबले होते. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे एसटी महामंडळाचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊन काळात फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ने- आण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या मुंबई, ठाणे आणि पालघर या विभागात विशेष बस फेऱ्या चालविण्यात येत आहे. तेव्हापासून जयश्री कंचकटले या महिला वाहक नालासोपारा आगार स्टँड बुकिंग जबाबदारी देण्यांत आली होती. गेल्या अडीच महिन्यापासून जयश्री आपली सेवा देत आहे. मात्र तिच्या हातून गुरुवारी एक इतिहासिक कामगीरी घडली  आहे. जयश्रीने नालासोपारा आगारात ८ तासांत ६१ हजार रुपयांचे एसटी तिकिटांची बुकिंग केली आहे. यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळत  कोल्हापूर -पुणे दोन महिलांनी एका दिवसांत ५८ हजार रुपयांचे  स्टँड बुकिंग केले होते. आजपर्यंत या दोन महिलांच्या रेकॉर्ड कोण्ही तोडला नव्हता. मात्र जयश्रीने आठ तासांतच ६१ हजार ६०० रुपयांची बुकिंग करून एसटी महामंडळात एक नविन इतिहास रचला आहे. यांची कल्पनाही जयश्रीला नव्हती, मात्र कामगिरी पूर्ण करून सॅण्ड बुकिंग जमा झालेली रक्कम एसटीच्या रोकड विभागाला दिली. तेव्हा आजपर्यँतची सर्वाधिक सॅण्ड बुकिंग असल्याची माहिती समोर आली आहे. जयश्रीने मोठ्या कौशल्याने काम करत आठ तासात झटपट तिकीट बुकिंग केली आहे. जयश्रीला दोन लहान मुले आहे, तरी सुद्धा घरातील सर्व घर कामेकरून  लॉकडाऊन काळात कर्तव्यावर येत आहे. आपली उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्यामुळे जयश्रीने आज  एसटी महामंडळातील सर्व महिला कर्मचाऱ्यांसमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार नालासोपारा आगारात सकाळी ५ वाजतापासून ते दुपारी १२ वाजून ३० मिनिटांपर्यत एक आठ तासांची शिप्ट असते. गुरुवारी नालासोपारा आगारात  सॅण्ड बुकिंगसाठी एकूण पांच एसटी वाचकांची नियुक्ती केली होती. सकाळी पासून ते दुपारी १२. ३०  वाजेपर्यंत या पांचही वाहकांनी १ लाख ९२ हजार ९८५ रुपयाचेएसटीच्या तिकीट बुकिंग केल्या होत्या,  यांपैकी  जयश्रीने ६१ हजार ६०० रुपपांची सर्वाधिक तिकीट बुकिंग केली आहे.

वाहक                    बुकींग

ज.अस.कचंकटले –       ६१६००

डी आर परदेशी –        ४०१२०

अ एन वळवी-           ४०३४५

यु एन. राऊत –         २८९३०

जी एस दराडे-          २१९९०

एकूण –               १,९२,९८५ रुपये

 

लॉकडाऊन काळात नालासोपारा आगारातील जयश्री कचंकटले हि महिला वाहक नियमित कामांवर हजर होत आहे. आपले कर्तव्य एकदम चोखपणे बजावत आहे. गुरुवारी तिने मोठ्या कौशल्याने आपल्या ८ तासाच्या ड्युटीत ६१ हजार ६०० रुपयांची  स्टँड बुकिंग केली आहे. ती आपर्यतची सर्वाधिक बुकिंग आहेत.

– दिलीप भोसले, आगार व्यवस्थापक


हे ही वाचा –