लॉकडाऊनमुळे मुंबईच्या महसूलावर फटका

राज्यातील सर्वच शहरात मुंबईचा वाटा हा सर्वाधिक असतो. पण लॉकडाऊनमुळे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागात मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच निच्चांक गाठण्याची वेळ राज्याच्या आजवरच्या इतिहासात घडलेली आहे. राज्यातील सर्वच शहरात मुंबईचा वाटा हा सर्वाधिक असतो. पण लॉकडाऊनमुळे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागात मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. परिणाम राज्याच्या तिजोरीला महत्वाचा वाटा देणाऱ्या विभागातच आता खडखडाट झाल्याचे चित्र कोरोनाच्या संकटामुळे दिसून आले आहे. मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात फक्त एकच नोंदणी झाल्याची आकडेवारी सबंध मुंबई शहरातून आहे.

मुंबईतून वर्षापोटी कोट्यावधी रूपयांचा महसूल हा राज्याच्या तिजोरीला मिळतो. पण कोरोनाचा फटका हा मुद्रांक आणि नोंदणी विभागालाही बसलेला आहे. मुंबई शहरातील आकडेवारीच हे बोलक चित्र स्पष्ट करणारी आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाच्या संकटामुळे राज्याचा हा महसूल बुडाला आहे. मे महिन्याच्या पहिल्या दिवसात झालेल्या नोंदणीवरून ही बाब उघड होते. मुंबईत झालेल्या एकट्या ई रजिस्ट्रेशनच्या व्यवहारातून राज्याला अवघे ४२४ रूपये इतका महसूल मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या संकटामुळे सातत्याने मुद्रांक शुल्क आणि नोंदणीत घट पहायला मिळाली आहे. एप्रिल महिन्यातही अवघ्या २७ कागदपत्रांची नोंदणी झाली होती.

मार्च महिन्यात सुमारे २५ हजार १७० दस्तावेजांची नोंद झाली होती. तर एप्रिल महिन्यात हा आकडा अवघ्या दोन अंकावर खाली आहे. राज्याला फेब्रुवारी महिन्यात ४७० कोटी रूपयांचा महसूल मुद्रांक शुल्क आणि नोंदणीच्या माध्यमातून मिळाला होता. मार्चमध्ये हा महसूल ३७७ कोटी रूपयांवर आला. तर एप्रिलमध्ये अवघे ४३ हजार ५४७ रूपये इतकाच महसूल प्राप्त झाला. मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात अवघा ४२४ रूपयांचा महसूल राज्याला प्राप्त झाला आहे.